शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

वाढीव क्षेत्रात ‘बॅक डेट’च्या आधारे व्यावसायिक बांधकाम

By admin | Updated: May 9, 2016 02:23 IST

नगरपरिषदेच्या हद्द वाढीनंतर बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी ‘बॅक डेट’ चा आधार घेऊत बिल्डरांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याचे प्रकार येथे सुरू आहे.

पालिका प्रशासन अनभिज्ञ : पाच वर्षांपूर्वीच्या परवानगीवर बांधकामयवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्द वाढीनंतर बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी ‘बॅक डेट’ चा आधार घेऊत बिल्डरांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याचे प्रकार येथे सुरू आहे. स्थानिक दारव्हा मार्गावरील एका बिल्डरने तर २०११ मध्ये लोहारा ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आणि बांधकामाला आता सुरुवात केली आहे. वडगाव आणि लोहारा या परिसरात सार्वाधिक व्यावसायिक बांधकाम केले जात आहे. नागरी वस्तीमध्ये अनेकांनी रुग्णालये थाटली आहेत. याची नगररचना विभाग आणि नगरपरिषदेकडून कोणतीच परवानगी घेतलेली नाही. काहींनी ग्रामपंचायतींच्या माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस ठरावाच्या आधारे दोन वर्षापूर्वीच परवानगी घेतल्याची कागदपत्रे तयार केली आहे. याचे मोठे रॅकेट शहराच्या वाढीव क्षेत्रामध्ये सक्रिय झाले आहेत. या रॅकेटच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली जात आहे. गावातील काही नामांकित आर्किटेक्चरचाही या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग आहे. सही शिक्क्याचा वापर करून खोटे दस्तावेज बनविणे हा नवीन प्रकार नाही. त्यामुळे बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी अनेकांनी हा शॉर्टकट निवडला आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. दारव्हा मार्गावर एका बिल्डरने अशाच पध्दतीने बांधकाम सुरू केले आहे. हे काम करत असताना चक्क शेजारच्या व्यक्तीच्या घराचे वॉल कंम्पाऊड पाडले. याच मार्गावर उद्योग भवन परिसरात एका राजकीय बिल्डराने प्लॉटचा एटंरन्स बदलविण्यासाठी महामार्गावर समांतर रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. फाईव्हस्टार हॉटेल थाटण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. याच मार्गावर असलेल्या दुचाकी, चारचाकीच्या शोरूम चालकांनी महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथे जीवघेणे अपघात होतात. याकडे पालिका प्रशासनाचे कोणतेच लक्ष नाही. राजकीय आणि धनदांडग्यांचे हे अतिक्रमण सामान्यांच्या जीवावर उठणारा आहे. विनापरवागीने गगनचुंबी इमारती बांधकामाचा धडाका सुरू केला आहे. यातून शहरात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)