शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

साडेसोळा हजार ब्रास रेतीच्या लिलावाची राबिवणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या दोन पथकांनी शहराच्या विविध भागात रेतीसाठ्यांवर जाऊन पाहणी केली. नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून नेमका रेतीसाठा किती, याचा अहवाल घेतला. त्यानुसार ५४ ठिकाणी रेतीसाठे आढळून आले. यातील आठ रेतीसाठ्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे ४६ रेतीसाठ्यांच्या लिलावाची प्रक्रिया केली जात आहे.

ठळक मुद्देशहरात अवैध साठे : अडीच हजार रुपये ब्रास अपसेट प्राईज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह जिल्ह्यात रेतीमाफियांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. लिलाव झालेल्या रेती घाटांपेक्षा लिलाव न झालेल्या रेती घाटातून रेतीचा मनमानी उपसा केला आहे. हा रेतीसाठा यवतमाळ शहरात सर्वत्रच दिसून येतो. अक्षरश: रेतीघाटापेक्षा अधिक रेती शहरातील चौफेर साठविली आहे. या व्यवसायात कुख्यात गुंडांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे ठोस कारवाई होताना दिसत नाही. तहसील कार्यालयाने ५४ रेतीसाठ्यांना अधोरेखित करून तेथील १६ हजार ८३९ ब्रास रेतीच्या लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे.तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या दोन पथकांनी शहराच्या विविध भागात रेतीसाठ्यांवर जाऊन पाहणी केली. नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून नेमका रेतीसाठा किती, याचा अहवाल घेतला. त्यानुसार ५४ ठिकाणी रेतीसाठे आढळून आले. यातील आठ रेतीसाठ्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे ४६ रेतीसाठ्यांच्या लिलावाची प्रक्रिया केली जात आहे. खणीकर्म विभागाने रेतीची अपसेट प्राईज ही दोन हजार ५९४ रुपये इतकी निश्चित केली आहे. लिलावात हा दर वाढणार आहे. जो जास्त बोली लावेल, त्याला ही रेती विकण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. दोन नायब तहसीलदारांच्या चमूने जाऊन पाहणी केली. या लिलाव प्रक्रियेतून किमान पाच कोटी ८९ लाख ३६ हजार ५०० इतका महसूल अपेक्षित आहे. ही लिलावाची प्रक्रिया सात दिवसांच्या आत जाहीरनामा काढून पूर्ण करण्याची तयारी महसूल विभागाने चालविली आहे.  

अनेक रेतीसाठे कारवाईपासून दूर- रेतीच्या व्यवसायात महसुलातील तलाठ्याची थेट भागीदारी आहे. त्या तलाठ्याने सोयीस्करपणे काही रेतीसाठे या कारवाईपासून दूर ठेवले आहेत. इतकेच नव्हे, तर रेतीचा साठा हा कागदोपत्री कमी दाखविण्यासाठीही वेगळ्या पद्धतीचा दबाव बांधकामच्या यंत्रणेवर आणला. कोट्यधीश असलेल्या या कर्मचाऱ्याकडून मोठी खेळी करण्यात आली आहे. हे रेतीसाठेसुद्धा रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. पहिल्यांदाच महसूल विभागाला दंडातून मोठी रक्कम वसूल करण्याची संधी आली आहे. कोरोनाच्या काळात राज्य शासनाचा कोष रिकामा आहे. तो भरण्याची संधी आहे. 

 

टॅग्स :sandवाळू