शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

गावातील समस्यांची गावातच व्हावी सोडवणूक

By admin | Updated: September 8, 2015 04:36 IST

सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. समस्यांची

यवतमाळ : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. समस्यांची सोडवणूक गावातच होऊ शकते. ग्राम समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची कामे गावातच व्हावी, असा प्रयत्न असून त्यासाठी गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.दिग्रस तालुक्यातील डोळंबा व महागाव येथे शुक्रवारी ग्राम समाधान शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरास जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, रुक्मिणी उकंडे, पंचायत समिती सदस्य अमोल मोरे, तहसीलदार नितीन देवरे, डॉ. विष्णू उकंडे, राजकुमार वानखडे, डोळंबा येथील सरपंच श्वेता जाधव, महागाव येथील सरपंच प्रभू जाधव, उपसरपंच भीमराव नाटकर उपस्थित होते.दोनही शिबिरास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधारकार्ड नोंदणीसोबतच गावकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. दोनही ठिकाणी २२ विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्या निकाली काढण्याचे काम दिवसभर ग्राम समाधान शिबिरात सुरु होते. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी विविध शासकीय योजनांची उदाहरणे दिली. प्रत्येकाने शासकीय योजना समजून संबंधित कार्यालयांमध्ये अर्ज दाखल केले पाहिजे, असे आवाहन केले. शासनाच्या योजना गावात व लाभार्थ्यांच्या घरात याव्या यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्या अनुषंगानेच ग्राम समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहे. प्रलंबित फेरफार, भूमिहीन मजुरांना अन्न सुरक्षेचा लाभ, विहीर नसणाऱ्यांना विहिरींचा लाभ देण्यासाठी शिबिरातून प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी विहिरीचा कोटा वाढवून घेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शेतकऱ्यांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी तातडीने बांधून घ्यावे. यासाठी शासन अनुदान देत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.शिबिरात विविध प्रकारचे दाखले, फेरफार, आधारकार्ड, निराधार अनुदान, अन्नसुरक्षा, शिधापत्रिकांसाठी नागरिकांकडून अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी दाखल झालेल्या अनेक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते शौचालय अनुदान, विविध प्रकारचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकांचे वाटप काही लाभार्थ्यांना करण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)