शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी तालुक्यातील समस्या वाऱ्यावर

By admin | Updated: May 9, 2016 02:31 IST

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तालुक्यातील प्रश्न दुर्लक्षित आहे. पाणी, रस्ते, नाल्या, वीज या व इतर समस्या ..

पाणीटंचाईवर प्रभावी उपाय नाही : रस्ते आणि विजेच्या प्रश्नामुळे नागरिक हतबलघाटंजी : प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तालुक्यातील प्रश्न दुर्लक्षित आहे. पाणी, रस्ते, नाल्या, वीज या व इतर समस्या निकाली काढण्यासाठी कुणाकडूनही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात भीषण पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागते. आजही अनेक गावांमध्ये हा प्रश्न गंभीर झालेला आहे. विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी, टँकर या तकलादू उपाययोजना केल्या जातात. उन्हाळा संपताच पाणीटंचाई हा विषयही मागे पडतो. परिसरात मोठमोठ्या नद्या आहेत. त्यावर बांध टाकण्यात आलेले आहे. मात्र त्यात पुरेसे पाणी अडत नाही. परिसरातील जलस्रोतांची पातळी टिकून राहण्यास या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न होत नाही. विविध गावांसाठीचे रस्ते खड्डामय झालेले आहे. वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी चांगला रस्ता शोधावा लागतो. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ही मुख्य रस्त्याची समस्या आहे. गावातील अंतर्गत रस्तेही दयनीय स्थितीत आहे. काँक्रिट रस्त्यांना भेगा पडलेल्या आहे. काही ठिकाणी काँक्रिट उखडल्याने खड्डे पडलेले आहेत. यावरून सदर कामांचा दर्जा कसा असेल, हे स्पष्ट होते. कामात गैरप्रकार झाल्याचे धडधडीत दिसत असतानाही संबंधित कंत्राटदार अथवा अधिकाऱ्यांवर कारवाईचे सौजन्य दाखविले जात नाही. गावांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत. असल्या तरी कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी आणि जागोजागी तयार झालेली गटारं यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्याची दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव या बाबी झोप उडविणाऱ्या ठरत आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी हा विषय कानावरही घेत नाही. पदाधिकारी आणि ग्रामसचिवांचे मात्र त्यांच्यावर नियंत्रण नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांकडे मांडलेले प्रश्न सोडविले जात नाही. सांडपाण्याच्या प्रकारावरून गावांमध्ये भांडणतंट्यांचे प्रकार वाढलेले आहे. तालुक्याच्या काही गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. याचा परिणाम काही लोकांच्या व्यवसायावर होतो. पाणीपुरवठ्याच्या योजनाही सदर बाबीमुळे प्रभावित होतात. विद्युत कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ग्रामीण भागात एकदा गुल झालेली वीज केव्हा येईल, याचा कुठलाही नेम नाही. आधीच विजेचा कमी तास पुरवठा, त्यातही लपंडाव यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या सर्व प्रश्नांकडे तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)