शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आर्णीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:51 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन, दाभडी येथे लावला सरकारच्या निषेधाचा फलक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.तूर, हरभरा खरेदीचा प्रश्न, पीक विम्याची न मिळालेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. या सर्व प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आर्णी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शेतकऱ्यांची सभा झाली. त्यानंतर मुख्य मार्गाने आर्णी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आमदार ख्वाजा बेग, बाजार समिती सभापती राजू पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, रवींद्र नालमवार, शेखर खंदार, चिराग शाह, उमेश ठाकरे, उमेद फानन, खलील बेग, अमीन भाटी, ज्योत्स्ना ठाकरे, निलंकुश चव्हाण, यासीम नागानी, राजू गावंडे, राजन भागवत, गणेश मोरे, परशराम राठोड, फिरोज सोलंकी, गोपाल कोठारी, मुबारक तंवर, रामेश्वर चौधरी, संदीप बुटले, तुकाराम आडे आदी उपस्थित होते.दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाचा फलक तालुक्यातील दाभडी येथे लावण्यात आला. त्यावर ‘क्या हुआ तेरा वादा’ असे लिहिण्यात आले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा