शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:50 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित झाला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव पारित : पोषण आहार, शिक्षक निलंबन गाजले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित झाला. या सभेत सदस्यांनी पोषण आहार, शिक्षकांचे निलंबन, बदल्या आदींवरून शिक्षण विभागावर थेट हल्लाबोल केला. त्यामुळे ही सभा प्रचंड वादळी ठरली.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेची सुरूवातच शिक्षण विभागापासून झाली. शिक्षण समितीत ठराव घेताना सर्वच अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना असल्याचे सांगून शिक्षणाधिकारी सदस्यांची दिशाभूल करतात, असा आरोप सदस्यांनी केला. सर्वच अधिकार सीईओंना असतील, तर सदस्य आणि समित्यांचे कामच काय, असा प्रश्नही त्यांनी केला. अनेक शाळांमध्ये सुविधा नाहीत, लोहारा येथील दोन पाळीतील शाळा एकाच पाळीत कुणाच्या आदेशावरून करण्यात आली, आदी प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी केली.हिवरी-अकोलाबजार सर्कलच्या सदस्य रेणूताई शिंदे यांनी अकोलाबाजार येथील शाळेचे वास्तव मांडले. यांनी या शाळेत चक्क एक्सपायरी झालेल्या साहित्याची खिचडी विद्यार्थ्यांना दिले जाते, असा आरोप केला. त्याची सत्यता पटवून देण्यासाठी त्यांनी चक्क एक्सपायरी डेट उलटलेल्या काही साहित्याचे पुडेच सभागृहात सादर केले. त्यात मसाल्याच्या पाकिटवर चक्क दहा महिन्यांपूर्वीची एक्सपायरी डेट होती. तोच मसाला अद्याप खिचडीत वापरण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अकोलाबाजार शाळेतील स्वयंपाकगृहात प्रचंड अस्वच्छता असल्याचा आरोप रेणूताई शिंदे यांनी केला. तेथील खिचडी बणविण्याचे गंज जंगलेले आहेत. इतर भांडी अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळले, असा घणाघात त्यांनी केला. त्यावर शिक्षणाधिकारी निरूत्तर झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले.अशोक कठाणे नामक शिक्षकाच्या निलंबनाचा मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी अहवाल मागूनही का दिला गेला नाही. त्यांना तीन वर्षे निलंबित ठेवून मानसीक व आर्थिक त्रास का देण्यात आला. यात शिक्षणाधिकाºयांची चूक असून तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी सदस्यांनी शिक्षणाधिकाºयांना केली. तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सभागृहात पटलावर ठेवला. त्यांची बदली होईपर्यंत अधिकार गोठवावे, अशी मागणीही लावून धरली. त्यामुळे अध्यक्षांनी अखेर १० मिनीटांसाठी सभा तहकूब केली. नंतर सभा पुन्हा सुरू होताच शिक्षणधिकाºयांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव पटलावर ठेवण्यात आला. तो पारित झाल्याचे अध्यक्षांनी घोषित केल्यानंतरच सभागृहातील वादळ शांत झाले.१० मिनिटांच्या नावाखाली एक तास तहकूबअध्यक्षांनी केवळ १० मिनीटांसाठी सभा तहकूब केली. तीसुद्धा एका सदस्याच्या मागणीवरून. मात्र १० मिनीटांऐवजी चक्क एक तास सभा तहकूब राहिली. तोपर्यंत अध्यक्षांच्या दालनात सर्व पदाधिकारी व काही सदस्यांची याच मुद्यावरून चर्चा सुरू होती. तेथे सीईओंनाही पाचारण करण्यात आले. नंतर प्रथम सीईओ परतले. त्यानंतर पदाधिकारी अन् अध्यक्ष परतल्या. परिणामी एक तासाने तहकूब सभा पुन्हा सुरू झाली. यात मनरेगामधील अपहार, सदस्यांना वाढीव मानधन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुख्याध्यापकांनी केलेली अफरातफर, जनावरांच्या शेडसाठी वाढीव निधी आदींवरून वादळी चर्चा झाली.