अनेक शाळांचा सहभाग : एकापेक्षा एक सरस देखावे सादर करणाऱ्या चमूंना रोख बक्षीस पुसद : छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने झांकी स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विजेते व सहभागी चमूंना सोमवारी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुसद अर्बन बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. यावेळी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष प्रा अजय क्षिररसागर, जेट किड्सचे प्राचार्य कौस्तुभ धुमाळे, सुशांत महल्ले, प्रा. अमोल व्यवहारे, किरण देशमुख, ललित सेता आदी मान्यवर उपस्थित होते. शोभायात्रेमध्ये मातोश्री पार्वतीबाई नाईक कॉन्व्हेंट, कोषटवार दौलतखान विद्यालय, शिवाजी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, गुणवंतराव देशमुख विद्यालय, मातोश्री विद्यालय श्रीरामपूर, जेट किड्स, ज्योतिर्गमय विद्यालय, लोकहित विद्यालय, गुलाबनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थी व शिक्षकांनी विविध प्रसंगातून शिवरायांचा इतिहास जिवंत केला. एकापेक्षा एक सरस देखावे सर्वच शाळांनी सादर केल्याने समितीने सर्व चमूंचा अडीच हजार रुपये रोख रक्कम व गौरव चिन्ह देऊन सन्मान केला. शहरातील विविध नृत्य संस्थांनी यामध्ये महत्वाचे योगदान दिले. आकाश गवळी, आकाश पाईकराव, अमोल भालेराव, कोल्हे यांच्या चमूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. चार वर्षांची चिमूकली सेजल पौळ हिने शोभायात्रेत खणखणीत पोवाडा सादर केला होता. तसेच ज्योतिर्गमयच्या चमूने देशभक्तीपर गीतावर सैनिकांची जीवनगाथा नृत्यातून सादर केली होती. यावेळी दोघांनाही बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या तर्फे प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. शोभायात्रेत शिवरायांची भूमिका साकारणारे हरीश सेता, अक्षय चालीकवार, संजय वर्मा, बालशिवाजी सुधांशू देशमुख यांना छत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. सामान्य ज्ञान स्पर्धेतील अ गटातील प्रथम विजेते पियूष भगत, निर्मला मंदाडे, द्वितीय विजेता अपूर्वा जाधव ओजस्वी अंबारे, तृतीय तन्वी पौळ, पार्थ वांगे, निकिता गवई, गजानन देशमुख यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ब गटातील प्रथम क्रमांक श्रीधर सुरोशे, द्वितीय क्रमांक आकाश पारधी, तृतीय क्रमांक श्रेयस महामुने, सुमित गावंडे, अमित गावंडे यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सहभागी शाळांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अजय खैरे, प्राचार्य बंडू खराटे, शशिकांत जामगडे, चंद्रकांत ठेंगे, अनंत जाधव, विवेक टेहरे, निलेश अग्रवाल, शक्ती दास, अरुण ठाकरे, यशवंत चौधरी, राजू भिताडे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक विदयार्थी व पालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सामान्य ज्ञान स्पर्धेच्या विजेत्यांचा गुणगौरव
By admin | Updated: March 2, 2017 00:58 IST