दारव्हा : येथील जाधव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये नवरात्राच्या पहिल्याच दिवशी कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. अद्याप शासनाने कापूस खरेदीचा मुहूर्त काढला नाही. मात्र व्यापाऱ्यांनी नवरात्रापासूनच कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे. शनिवारी येथील जाधव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये तालुक्यातील धुळापूर येथील संजय गेडाम यांनी कापूस विक्रीस आणला. पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बैलगाडीचे पूजन करून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. शुभारंभाला पाच हजार ५०० रुपये प्रती क्विंटलचा भाव देण्यात आला. यावेळी संचालक भाऊराव जाधव, शरद गुल्हाने, बाळासाहेब गडलिंग, विकास भाऊराव जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कापसाच्या मुहूर्ताला साडेपाच हजाराचा भाव
By admin | Updated: October 2, 2016 00:23 IST