शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

७०० कोटी वाटपापूर्वी कर्ज वितरण गुंडाळण्याची तयारी

By admin | Updated: August 12, 2016 02:05 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता अद्यापही कायम असून ७०० कोटी

सहकार बैठकीकडे पाठ : बँका म्हणतात, कर्ज वाटपाचे लाभार्थी संपले! यवतमाळ : खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता अद्यापही कायम असून ७०० कोटी रुपयांच्या वाटपापूर्वीच कर्ज वितरण प्रक्रिया गुंडाळण्याच्या हालचाली आहे. यात राष्ट्रीयकृत बँका आघाडीवर असून सहकार विभागाच्या बैठकीकडेही या बँकांनी पाठ फिरविल्याची माहिती पुढे आली आहे. खरीप हंगामात जिल्ह्याला १७३६ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करायचे होते. प्रत्यक्षात बँकांनी १०६४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. उद्दीष्टाच्या ६१ टक्के कर्ज वितरण केले आहे. यानंतरही तब्बल ७०० कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले नाही. जून अखेरीस कर्ज पुनर्गठनाच्या वाटपाची मुदत संपली. १५ दिवसाने खरीप कर्ज वाटपाचा कालावधी संपणार आहे. त्यामुळेच सहकार विभागाने कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. ९ आॅगस्टला ही बैठक घेण्यात आली. १२ बँकांना आमंत्रण पाठविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पाच बँकांचेच प्रतिनिधी उपस्थित झाले. एसबीएच आणि बँक आॅफ इंडियाने सर्वात कमी कर्ज वाटप केले. या बँकांचे पदाधिकारी या बैठकीकडे आलेच नाही. कमी कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी आता सहकार विभागाच्या बैठकीकडेही पाठ फिरविली आहे. तर उपस्थित असलेल्या बँकांनी कर्ज वाटपाचे सदस्य संपल्याचे स्पष्टीकरण सहकार विभागाला दिले. त्यामुळे आता पुढील १५ दिवसात या बँका कर्ज वाटणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. बँकांच्या या अडवणुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. यानंतर धोरणात्मक निर्णय काय होणार यावर पीक कर्जाचे गणित अवलंबून राहणार आहे. राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपात कुणाचेही जुमानत नसल्याचे दिसून येते. शासन निर्णय आणि जिल्हा प्रशासनालाही या बँकांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येते. एकंदरित राष्ट्रीयकृत बँकांच्या मनमानीपुढे प्रशासनानेही हात टेकल्याचे दिसून येत आहे. (शहर वार्ताहर) बैठकीला अग्रणी बँक व्यवस्थापकांची दांडी राष्ट्रीयकृत बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्रणी बँकेची नियुक्ती केलेली असते. येथील व्यवस्थापकांचा या बँकेवर वॉच असतो. परंतु सहकार विभागाने ९ आॅगस्ट रोजी आयोजित केलेल्या बैठकीला अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनीच दांडी मारली. त्यामुळे इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींचे चांगलेच फावले. जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी या बैठकीत उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींना वेळेपूर्वी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु ज्या बँका शासन आणि प्रशासनाला जुमानत नाही त्या कर्ज वितरित करतील काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.