शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:24 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देसंडे अँकर । ईव्हीएमची तपासणी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहितेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जारी होण्याची शक्यताही गुल्हाने यांनी वर्तविली. जिल्ह्यात कुठेही फारशी दुष्काळाची स्थिती नाही. धूळपेरणी केलेल्यांची पेरणी उलटली असली तरी त्याचे क्षेत्र अगदीच कमी आहे. टार्गेटऐवजी पात्र शेतकऱ्यांचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप बरेच वाढले आहे.शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आहे. तरीही सध्या होत असलेल्या आत्महत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. पाऊस पाण्यामुळे बाधित झालेल्यांच्या आवश्यकतेनुसार सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले आहे. काही भागात पिकांवर अळ्या दिसत असल्या तरी त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहे. निवडणुकांपूर्वी बहुतांश विकास कामे मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.शंभरावर कुमारी मातांच्या पुनर्वसनावर प्रशासनाचा भरजिल्ह्यातील पांढरकवडा विभागात कुमारी माता हा मोठा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाचा फोकस सध्या कुमारी मातांवर आहे. त्यांचे पुनर्वसन, रोजगार यावर भर दिला जात आहे. विविध पद्धतीने छाननी करून सुमारे शंभर कुमारी मातांची यादी तयार करण्यात आली आहे. या जोखडातून बाहेर काढण्यासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय त्यांना निवासाची व्यवस्था, घरकूल उपलब्ध करून देऊन त्यांचे कायम पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात शंभर पैकी ३६ ते ४० कुमारी मातांच्या हाताला रोजगार देण्याचे नियोजन आहे. याशिवाय त्यांचे समूपदेशन केले जात आहे. पुन्हा कुणी कुमारी माता बनू नये म्हणून त्या परिसरातील कुटुंबांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुमारी मातांच्या प्रश्नावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष असल्याचे अजय गुल्हाने यांनी सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनvidhan sabhaविधानसभा