शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘पीआरसी’ चमू जिल्हा परिषदेत

By admin | Updated: January 29, 2016 05:07 IST

जिल्हा परिषदेतील शासकीय निधीच्या नियमबाह्य खर्चावर गंभीर स्वरूपाचे १७८ आक्षेप लोकल फंडकडून नोंदविले गेले.

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील शासकीय निधीच्या नियमबाह्य खर्चावर गंभीर स्वरूपाचे १७८ आक्षेप लोकल फंडकडून नोंदविले गेले. या आक्षेपांची बुधवारी व गुरूवारी विधीमंडळाच्या पंचायत राज समिती शाखेच्या चमूने तपासणी केली. या माध्यमातून या आक्षेपांचे अनुपालन करण्याची अखेरची संधी जिल्हा परिषदेला दिली गेली आहे. स्थानिक निधी लेखा संचालक कार्यालयाच्या पंचायत राज समिती शाखेचे मुंबई येथील सहायक संचालक संजय गोरे यांच्या नेतृत्वातील चमू बुधवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत दाखल झाली. या चमूमध्ये लेखाधिकारी मोरे, सहायक लेखाधिकारी पारे यांचा समावेश आहे. यवतमाळच्या स्थानिक निधी लेखा विभागाची टीमही त्यांच्या दिमतीला होती. मुंबईच्या या चमूने लेखा आक्षेपांची तपासणी केली. जिल्हा परिषदेचे विविध १३ विभाग आणि १६ पंचायत समित्यांचे सन २०१३-१४ चे लेखा परीक्षण लोकल फंडमार्फत करण्यात आले. त्यात शासकीय निधीचा हिशेब न लागणे, नियमबाह्य खर्च, खर्चाची देयके सादर न होणे, चुकीच्या पद्धतीने खर्च होणे अशा स्वरूपाचे सुमारे १७८ गंभीर आक्षेप नोंदविले गेले. त्यात सर्वाधिक आक्षेप हे बांधकाम विभाग क्र. १ व क्र. २ चे असल्याचे सांगितले जाते. तेथेच शासकीय निधीच्या गोंधळाची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली. या लेखा आक्षेपांमध्ये कोट्यवधी रूपयांच्या रकमा अडकून पडल्या आहेत. हे लेखा आक्षेप विधीमंडळाच्या पंचायत राज समितीला सादर होणाऱ्या अहवालात समाविष्ठ केले जाणार आहे. परंतु त्यापूर्वी या आक्षेपांचे अनुपालन करण्याची अखेरची संधी जिल्हा परिषदेला दिली जात आहे. त्यासाठीच ‘पीआरसी’ शाखेची ही चमू बुधवारी येथे आली होती. गुरुवारीही या चमूने आक्षेप अनुपालनाची कार्यवाही केली. लेखा परीक्षकाकडून नोंदविल्या गेलेल्या आक्षेपांचे काही रेकॉर्ड असेल तर उपलब्ध करून द्यावे म्हणून ही संधी दिली गेली होती. मात्र १७८ पैकी सुमारे ५० आक्षेपांचे अनुपालन केले गेले. उर्वरित सुमारे सव्वाशे गंभीर लेखा आक्षेप विधीमंडळ पंचायत राज समितीच्या अहवालात आता समाविष्ठ केले जाणार आहे. अर्थात सदर आक्षेपांशी संबंधित सर्वांना यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)