शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

मानधनाच्या प्रतीक्षेत ३४ निराधारांनी सोडले प्राण

By admin | Updated: July 23, 2014 00:14 IST

निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला.

उपेक्षा कायम : महागाव तालुक्यातील निराधार आंदोलन करूनही थकलेमहागाव : निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. निराधार मंडळी लाभासाठी तहसीलचे उंबरठे मात्र कायम झिजवित आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध निराधारांना लाभ मिळत होता. मात्र २०११ मध्ये तालुक्यातील तीन हजार लाभार्थी या योजनेतून अचानक बाद झाले. एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. अनुदानासाठी दररोज तहसील कार्यालयावर वृद्ध निराधार धडकत आहे. या निराधारांचा प्रश्न घेऊन पंचायत समितीचे माजी सभापती डी.बी. नाईक, जगदीश नरवाडे यांनी वारंवार आंदोलने केली. गेल्या दोन महिन्यापूर्वी तर प्रदीर्घ लढा देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनकर्ते पदयात्रा करीत उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान किसान सभेचे पॉलिटब्युरो सीताराम येचुरी यांनी थेट उपजिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांना विचारणा केली होती. मात्र अनुदान मिळाले नाही. वृद्ध निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने उपासमार होत आहे. वृद्धापकाळात दुसऱ्या पुढे हात पसरण्याचा अपमानास्पद प्रसंग या वृद्धांवर आला आहे. अशा परिस्थितीत ३४ जणांनी जगाचाच निरोप घेतला. त्यात अंबाजी बनसोडे, आनंदा रोकडे उटी, शेख इमाम शेख फतरु मोरथ, तुळशीराम इंगोले जनुना, अंजूबाई ठाकरे, जनाबाई बोरकर, अनुसया चौधरी, नारायण राऊत करंजखेड, मुक्ताबाई भांडवले कलगाव, तुळसाबाई अढागळे कोठारी, शेख इमाम शेख चाँद काळी टेंभी, शेख हलीमा शेख शेरु, दगडूबाई गोंडाडे, अंजूबाई गुलाब, अनुसया लांडगे, धारुबाई भगत, हुसानाबी नवाबोद्दीन फुलसावंगी, गोपाळ शिंदे इजनी, रायभान चपाट, मुकुंदा भगत वेणी, बैनाबाई गडदने, भाऊ हनवते, शारदाबाई हनवते, गुणाबाई हुलगुंडे सवना, सावित्रीबाई लहाने माळकिन्ही, सरूबाई लोखंडे, धरुबाई गरडे सारखनी, यशोदाबाई पहूर पिंपळगाव, सरस्वती चिपडे, गयाबाई ढोले, नामदेव ढोले, तोतीबाई राठोड गुंज, नागोराव फुलउंबरकर कान्हा, दुर्गाबाई खोकले पिंपळगाव यांचा समावेश आहे. अनेक निराधार अखेरच्या घटका मोजत आहे. परंतु प्रलंबित प्रकरणांवर प्रशासन तोडगा काढायला तयार नाही. आता प्रशासनाला किती बळी हवे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. (शहर प्रतिनिधी)