शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:25 IST

शहरातील भीषण पाणीटंचाई आणि तुरीच्या रखडलेल्या चुकाºयाचा प्रश्न घेऊन प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक दिली. मात्र पोलिसांनी मोर्चा दत्त चौकातच रोखल्याने मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

ठळक मुद्देपोलिसांनी रोखला मोर्चा : यवतमाळातील पाणी व तुरीच्या चुकाऱ्याचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील भीषण पाणीटंचाई आणि तुरीच्या रखडलेल्या चुकाऱ्याचा प्रश्न घेऊन प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक दिली. मात्र पोलिसांनी मोर्चा दत्त चौकातच रोखल्याने मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झाले आहे. पाण्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्याती नाफेडचे शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. तसेच तुरीचे चुकारेही रखडले आहे. यामुळे पेरणीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. या प्रश्नासंदर्भात जाब विचारण्यासाठी प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चाला दत्त चौकातच पोलिसांनी अडविला. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले. पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना त्याच ठिकाणी स्थानबद्ध केले. त्यामुळे निवेदनही देता आले नाही. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी केले. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख नितीन मिर्झापुरे, हंसराज सोमवंशी, तुषार भोयर, आशिष तुपटकर, रूपेश चरडे, गोपाल चव्हाण, रणजित जुमळे, नरेश भोयर, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. या आंदोलनामुळे दत्त चौकात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.कडेकोट बंदोबस्तयवतमाळ शहरातील पाण्याचा प्रश्न २६ मेपर्यंत सुटला नाही तर पालकमंत्र्यांच्या घरापुढे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला होता. यवतमाळ शहरातील पाणीटंचाई तर सुटली नाही, उलट पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला. आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी प्रहारचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा घेऊन धडकले. परंतु पोलिसांनी यापूर्वीच निवासस्थान परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला होता. हा मोर्चा दत्त चौकातच अडविला.