घाटंजी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त १८ आॅक्टोबर रोजी साखरा येथील बा.दे. विद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता प्रबोधन व शेतकरी मेळावा होणार आहे. उद्घाटन माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अध्यक्षतेत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, अनिल अण्णा गोटे, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, उपसभापती रमेश धुर्वे आदी उपस्थित राहतील. दिलीप कोटरंगे, आनंद गायकवाड, कवडूजी नगराळे, प्रा. रतन राठोड आदी यावेळी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजक झिबल वाढई यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
साखरा येथे प्रबोधन व शेतकरी मेळावा
By admin | Updated: October 18, 2015 02:53 IST