शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण न होता कमी खर्चात होणार वीज निर्मिती! यवतमाळच्या तरुणाचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 15:15 IST

Yawatmal news यवतमाळच्या तरुणाने प्रदूषण विरहित आणि अत्यल्प खर्चात वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळविणारा तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञही ठरला आहे.

ठळक मुद्देको-जनरेशन पावर प्लांट२० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पेटेंट

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वीज ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे. मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून होणारे प्रचंड प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यावर मात करीत यवतमाळच्या तरुणाने प्रदूषण विरहित आणि अत्यल्प खर्चात वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळविणारा तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञही ठरला आहे.

यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या तरुणाचे नाव आहे रितीक आनंद अमरावत. रितीक फक्त २० वर्षे वयाचा आहे. मात्र या अत्यल्प वयात त्याने आपल्या प्रयोगाद्वारे सर्वांनाच चकित केले आहे. प्रदूषण न होता वीज निर्मिती करता येते, ही गोष्ट त्याने शक्य करवून दाखविली आहे. त्याच्या प्रोजेक्टचे नाव को-जनरेशन पावर प्लांट प्रोजेक्ट असे आहे. त्याने सोलर पावर स्ट्रीम व ॲसिटीलीन गॅसपासून वीज निर्मिती करून दाखविली आहे. ही विज निर्मिती करताना कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हीच बाब या प्रयोगाची जमेची बाजू असल्याचे बोलल्या जाते. या वीज निर्मितीचे पेटेंट भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात झालेले आहे. अशा प्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट घेणारा तो सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञ ठरला आहे. त्याला या प्रकल्पामध्ये यवतमाळचेच सुपूत्र शास्त्रज्ञ अजिंक्य कोट्टावार यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे त्याला अमरावती विद्यापीठाचे मेंबर ऑफ बोर्ड, इनोव्हेशन डाॅ. राजेशकुमार सांभे यांनीही मार्गदर्शन केले.

या पेटेंटसाठी काही लाखांचा खर्च होणार होता. परिस्थिती सामान्य असल्यामुळे इतकी रक्कम कोठून आणावी हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्यासोर होता. तरीही त्याने हिंमत सोडली नाही. त्याने उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा यांना याबाबत विनंती केली. त्यांनी रितीकला माजी मंत्री व विद्यमान आमदार मदन येरावार यांच्याकडे नेले. येरावार यांनी मदत केल्यामुळे हे पेटेंट आपल्याला मिळू शकले, अशी माहिती स्वत: रितीकने दिली. 

को- जनरेशन पावर प्लांटला वर्कींग मॉडेल बनवून तयार केले आहे.  या मॉडेलमधून प्रदूषण न होता कमी पैशात वीज निर्मिती करता येते.- रितीक अमरावत, यवतमाळ

टॅग्स :electricityवीज