शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: August 29, 2014 00:08 IST

वीज कंपनीच्या वडकी केंद्रांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बोगस कारभार सुरू असून याचा फटका परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. वडकी अंतर्गत अनेक गावे येतात. या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूरांची

मंगेश चवरडोल - किन्ही(जवादे)वीज कंपनीच्या वडकी केंद्रांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बोगस कारभार सुरू असून याचा फटका परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. वडकी अंतर्गत अनेक गावे येतात. या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोटरपंप व विहीर या दोनही बाबी असताना वीज पुरवठाच नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. परिसरातील गावांमध्ये वडकी वीज केंद्रावरून विद्युत पुरवठा पुरविण्यात आला आहे. परंतु २४ तासात १०० पेक्षा अधिकवेळा विजेची ये-जा सुरू असते.सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, व्यापारी सर्वच त्रस्त झाले आहेत. याबाबत वीज कंपनीच्या कार्यालयावर गावकरी तक्रारीसाठी वारंवार गेले असता तेथे कुणीही जबाबदार अभियंता कधीच उपलब्ध नसतो. अभियंता ताजने यांना त्यांच्या कार्यालयातूनच मोबाईलवर संपर्क करावा लागतो. त्यानंतर त्यांनी फोनवरच सांगितले की, मी वडकी कार्यालयाचा कायमस्वरूपी अभियंता नसून माझ्याकडे केवळ प्रभार आहे. तुम्ही कार्यालयात येवून नंतर भेटा. त्यांनी सांगितलेल्या तारखेवर कार्यालयात भेटावयास गेल्यास त्यादिवशी ते मात्र भेटत नाहीत. संबंधित किन्ही गावातील लाईनमनला फोन केल्यास आठ-आठ दिवसात लाईनमन बदलत असतात. त्यामुळे नेमका कुणाशी संपर्क साधावा, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. वडकी सर्कलमधील वीज कंपनीचे लाईनमन हे वडकीवरूनच संपूर्ण गावे पाहण्याचा प्रयत्न करतात. गावातील कोणत्याही खासगी व्यक्तीला फेज टाकण्यासाठी व वायर जोडण्यासाठी पाठवितात. यामुळे अपघाताची शक्यता फेटाळता येत नाही. गावागावातील डीपी फुटलेल्या आहे. अशा परिस्थितीत कुण्याही खासगी व्यक्तीकडून कामे करून घेणे म्हणजे मोठा धोका आहे. येथील वीज कंपनी कार्यालयाला कायमस्वरूपी अभियंता देण्यात यावा व प्रत्येक गावातील लाईनमनने आपली कामे स्वत: करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.