लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनतेच्या सेवेसाठी पोलीस विभाग नेहमीच तत्पर आहे. या विभागाच्या सकारात्मक बाबी नियमित प्रकाशित होणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्याच्या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ या लोकराज्य विशेषांकांत पोलिसांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. हा विशेषांक वाचनीय आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जानेवारीच्या लोकराज्य विशेषांकाचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, उपअधीक्षक (गृह) सेवानंद तामगाडगे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.पोलीस विभागासाठी असलेल्या योजना, सायबर गुन्हे, डिजिटल तपासाच्या स्मार्ट दिशा, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, सायबर युगाची आव्हाने, त्याचा पाठलाग, सागरी सुरक्षिततेची सज्जता, गृहरक्षक दल, प्रेरणादायी ऊर्जा, दक्षता यासह वनवैभव आणि निसर्ग पर्यटन, सुरक्षित वीज सुरक्षित जीवन, आर्थिक स्वावलंबन ते यशस्वी उद्योजिका, रोपवाटिका, ट्री मॉल, असे विषयसुध्दा ‘लोकराज्य’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांच्या सकारात्मकतेला स्थान गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:19 IST
जनतेच्या सेवेसाठी पोलीस विभाग नेहमीच तत्पर आहे. या विभागाच्या सकारात्मक बाबी नियमित प्रकाशित होणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्याच्या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ या लोकराज्य विशेषांकांत पोलिसांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे.
पोलिसांच्या सकारात्मकतेला स्थान गरजेचे
ठळक मुद्देएम. राज कुमार : अधीक्षक कार्यालयात विशेषांक प्रकाशन सोहळा