शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीसाठी गरिबांची घरकुले अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:02 IST

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे ८० टक्के काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राच्या आहे. असे असले तरी, प्रत्यक्षात रेतीच उपलब्ध न झाल्याने १३ हजार २४५ घरकुलाचे काम रखडले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचा दट्ट्या : १३ दिवसांत १३ हजार घरकुलांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे ८० टक्के काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राच्या आहे. असे असले तरी, प्रत्यक्षात रेतीच उपलब्ध न झाल्याने १३ हजार २४५ घरकुलाचे काम रखडले. आता उरलेल्या १३ दिवसात २६ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आवास योजना या माध्यमातून घरकुलांचे बांधणी करायची होती. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेला १८ हजार ४३४ घरकुलांची उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी ५६ टक्के काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला करता आले. आतापर्यंत ११ हजार ३१८ घरांचे काम ही यंत्रणा पूर्ण करू शकली.रमाई आवास योजनेत पाच हजार ५१३ घरकुलांचे काम पूर्ण करायचे होते. प्रत्यक्षात एक हजार ५०२ घरे पूर्ण झाली. एकूण उद्दिष्टांच्या ४० टक्के मजल याठिकाणी गाठता आली. शबरी आवाज योजनेत दोन हजार १९८ घरे बांधायची होती. यातील ८७२ घरांची कामे पूर्ण झाली आहेत. कोलाम आवास योजनेत ९६९ घरकूल पूर्ण करायचे होते. त्यातील केवळ २४३ घरे पूर्ण झाली. पारधी आवास योजनेत १२७ पैकी केवळ ६२ घरांचे बांधकाम झाले आहे.घरकुलाची कामे रखडण्याला रेती कारणीभूत ठरली आहे. सप्टेंबरपासून रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. यामुळे घरकूल बांधकामासाठी रेती उपलब्ध होऊ शकली नाही. यातून बांधकामे ठप्प पडली. जानेवारी अखेरपर्यंत उद्दिष्टांच्या ८० टक्के काम पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहे. रेतीघाटाचे लिलाव अजूनही झाले नाही. यामुळे उर्वरित उद्दीष्ट पूर्ण होण्याविषयी प्रश्नचिन्ह आहे.दुष्काळामुळे पुढील घरे होणार कशी ?रेतीअभावी घरकुलाचा पहिला टप्पा अडकला. आता दुष्काळी स्थितीने पाण्याअभावी इतर घरकुले रखडण्याची चिन्हे आहे. यामुळे बेघरांचे घरकुलाचे स्वप्न यावर्षी पूर्ण होण्याविषयी साशंकता आहे.