शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांनो, किलोभर साखरेत करा दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:22 IST

गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे.

ठळक मुद्देशासनाचा फतवा : जिल्ह्यातील सव्वा पाच लाख लाभार्थ्यांपुढे पेच, हेच का ‘अच्छे दिन’?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सरकार, जिल्हा प्रशासन व पुरवठा विभागाविरूद्ध जनतेत रोष पाहायला मिळतो आहे.राज्यात सव्वा पाच लाख रेशनकार्डधारक आहेत. त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने केली. आता खूप काही आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा या गोरगरीब कार्डधारकांना होती. मात्र प्रत्यक्षात भाजपा सरकारचा दिवाळीचा हा बार फुसका निघाला. दिवाळी गोड करण्यासाठी शासनाकडून रेशन कार्डवर केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्याचा दर २० रुपये प्रती किलो राहणार आहे. चार ते सहा जणांच्या कुटुंबाला किलोभर साखर दिवाळीसाठी पुरणार कशी, हा प्रश्न आहे. सरकारस्तरावर दौरे, बैठका, उद्घाटन, भूमिपूजन या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडून प्रचंड उधळपट्टी शासकीय तिजोरीतून सुरू आहे. तर दुसरीकडे गोरगरिबांना दिवाळीसारख्या सर्वात मोठ्या सणासाठी अवघी किलोभर साखर देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने गरिबांमध्ये केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.४० टक्के पुरवठा कमीरेशन कार्डावरील वाटपासाठी ५३० मेट्रिक टन साखर मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे तूर डाळ ५३० मेट्रिक टन, चणाडाळ १९७ मेट्रिक टन, उडीद डाळ ९७ मेट्रिक टन मंजूर करण्यात आली. यापैकी ६० टक्के मालाचा पुरवठा जिल्ह्याला झाला असून ४० टक्क्यांची मागणी आणखी नोंदविली गेली आहे.