शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पूल कमकुवत, तरीही वाहतूक सुसाट

By admin | Updated: August 5, 2016 02:32 IST

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील बिटीशकालीन पूल वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यवतमाळ : रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील बिटीशकालीन पूल वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात तूर्तास केवळ बोरीअरब येथील अडाण नदीवर एकच ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी उपयोगात आणला जात आहे. ब्रिटीशकालीन असलेल्या नांदुरा येथील पुलावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक बंद केली आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल मंगळवारी मध्यरात्री वाहून गेला. त्यावेळी या पुलावरून प्रवास करणाऱ्या काही बस व खासगी वाहनांना जलसमाधी मिळाली. यात जवळपास ४० च्यावर नागरिकांचे बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व पुलांचे अंकेक्षण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला असता, समाधानकारक स्थिती आढळली. सध्या जिल्ह्यात केवळ बोरीअरब येथील एकाच ब्रिटीशकालीन पुलावरून वाहतूक सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्ह्यात दोन ब्रिटीशकालीन पूल आहे. त्यापैकी बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील बेंबळा नदीवरील पूल सन २००८-०९ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. आता केवळ दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील अडाण नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरूनच अद्याप वाहतूक सुरू आहे. या पुलाची काही वर्षांपूर्वी दुरूस्ती करण्यात आली. तथापि हा पूल ब्रिटीशकालीन असल्याने बांधकाम विभागाने तेथे नवीन पुलाचा प्रस्ताव कधीचाच शासनाकडे पाठविला. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. परिणामी महाडसारखी दुर्घटना घडल्यानंतरच शासन बोरीअरब येथील नवीन पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ३२ मोठे पूल आहेत. ३० मीटर अथवा त्यापेक्षा लांबीच्या पुलाला मोठे पूल म्हणून ओळखले जाते. याशिवाय जवळपास प्रमुख ३० लहान पूल आहे. त्यापैकी पांढरकवडा तालुक्यातील रूंझा आणि पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील पूल जीर्ण झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी नवीन पुलांचे प्रस्ताव आहे. मात्र अद्याप त्यांनाही मान्यता मिळाली नाही. परिणामी अद्यापही जुन्याच जीर्ण पुलावरून वाहतूक सुरू आहे.