शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सांडपाण्याचे तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:31 IST

शहरातील अनेक भागात सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून उपयोग होत नसल्याने नागरिक वैतागले आहे.

ठळक मुद्देनागरिक वैतागले : नगरपरिषदेचे दुर्लक्ष, आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरातील अनेक भागात सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून उपयोग होत नसल्याने नागरिक वैतागले आहे.शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक रस्त्यांवर नालीतील सांडपाणी वाहात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांमुळे नागरिक बेजार झाले आहे. याबाबत नगरपरिषदेकडे अनेकांनी वारंवार तक्रार केली. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.शहरातील अमराई मेमन ले-आऊटमध्ये तर सांडपाण्याचे अक्षरश: तळे साचले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सांडपाण्याचे तळे निर्माण झाले आहे. या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी दहा वर्षांपासून हे सांडपाण्याचे तळे जैसे थे आहे. शहरातील इतरही अनेक परिसरात सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप, कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांचा सामना करावा लागत आहे. तथापि नागरिकांच्या आरोग्याचे नगरपालिकेला कोणतेही सोयरसूतक नाही.मेमन ले-आऊटमध्ये खुल्या जागेत जवळपास चार हजार ८७४ चौरस फूट जागेत खड्डा आहे. या खड्ड्यात शहरातील सांडपाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तक्रारींकडे दुर्लक्षअनेकदा पालिकेकडे तक्रारी करून दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आता प्रचंड संतप्त झाले आहे. या सांडपाण्याच्या तळ्यामुळे शहरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर परिसरात धार्मिकस्थळ असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाºयांना निवेदन देवून सांडपाणी इतरत्र काढून देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्याचा वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.