शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

खडकाळ जमिनीवर फुलली डाळिंबाची बाग

By admin | Updated: February 27, 2016 02:56 IST

हलक्या प्रतीच्या खडकाळ जमिनीवर एका शेतकऱ्याने डाळींबाची बाग फुलविली असून पहिल्याच तोडीत दोन टनाचे उत्पादन झाले.

प्रकाश सातघरे दिग्रस हलक्या प्रतीच्या खडकाळ जमिनीवर एका शेतकऱ्याने डाळींबाची बाग फुलविली असून पहिल्याच तोडीत दोन टनाचे उत्पादन झाले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर डेहणी येथील युवा शेतकऱ्याने यवतमाळ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. गजानन वेळूकर असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहे. परंपरागत पद्धतीने शेतीतून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नैराश्यात जात आहे. अशा या शेतकऱ्यांपुढे गजाननने आदर्श निर्माण केला आहे. दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे गजाननची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. परंतु ही शेती मुरमाड आणि खडकाड आहे. त्यामुळे यात काही हाती येत नव्हते. त्यामुळे गजाननने फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी डाळींब पिकाची निवड केली. ७५० झाडांची लागवड करून संगोपनासाठी परिश्रम घेतले. यातून त्याची बाग फुलली. सिंचन व्यवस्थेसाठी पाणी अपुरे पडत असतानाही त्यांनी मोठ्या परिश्रमाने झाडे जगविली. त्याची बाग डाळींबाने बहरुन गेली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या. दर्जेदार डाळींबाच्या पहिल्या तोडीतून दोन टन उत्पादन हाती आले. परंपरागत शेती व्यवसायाची होणारी अवस्था पाहून गजाननने केलेला हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता गजाननकडून मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक शेतकरी येत आहे. परंतु अद्यापही शासन दरबारी त्याची दखल घेतली नाही. फलोत्पादन योजनेंतर्गत वारंवार मागणी करूनही अनुदान नाकारल्याची खंत गजानन वेळूकर यांनी व्यक्त केली. शासकीय योजनेतील लाभाच्या योजना शेतकऱ्यांना दिल्यास त्याचा फायदा होईल. एकीकडे बळीराजा चेतना अभियान राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला निराश केले जात आहे. परंतु या परिस्थितीवरही मात करीत गजानन आपल्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे.