शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नद्यांमध्ये प्रदूषण वाढतेय

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

जिल्हय़ातून वाहणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो.

शुद्धीकरण मोहीम गरजेची : पावसाळ्यात नदी किनार्‍यावरील लोकांना फटकायवतमाळ : जिल्हय़ातून वाहणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो. त्यात कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरण मोहीम राबवित नाही. परिणामी नदी तिरावरील गावकर्‍यांना पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते.  यवतमाळ जिल्हय़ामध्ये वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. दोनही नद्या जिल्हय़ाच्या अनुक्रमे इशान्य व दक्षिण सीमेवरील वाहतात. जिल्हय़ाच्या मध्यभागात वाहणार्‍या उपनद्या वर्धा व पैनगंगा नद्यांना मिळतात. वर्धा नदी रुंदी अधिक असून खोलदेखील आहे. वर्धेच्या बेंबळा व निगरुडा या दोन प्रमुख उपनद्या आहेत. त्यापैकी निगरुडा नदी पूर्णत: वणी तालुक्यातून वाहते. तर बेंबळा बाभूळगाव तहसीलच्या उत्तरेकडून घाटाच्या पायथ्याशी वाहते. पैनगंगा नदीला सहा प्रमुख उपनद्या आहेत. पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भ या नावाने त्या ओळखल्या जाते. या सोबतच अनेक लहान-मोठय़ा नद्या व नाले आहेत. जिल्हय़ाला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. जिल्हय़ासाठी जीवनदायिनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात बेशरम वाढला आहे. मोठाले झुडुपे नदीपात्रात दिसून येतात. अडाण, पूस, धावंडा, गोखी, अरुणावती या नद्यांना बेशरमने आपल्या कवेत घेतले आहे. नदीचे पात्र पूर्ण हिरवेगार दिसते. तसेच काही नद्यात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. बेशरम आणि जलपर्णी वनस्पतीमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते. झुडुपांमध्ये मोठय़ा प्रमाणात केरकचरा अडकून असतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडुपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. थोडे जरी पाणी आले तरी नदीची थडी फुटून पाणी गावात शिरते. तसेच शेतातही शिरून मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी त्याच त्या गावांना पुराचा फटका बसतो. पुरामुळे कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करते. आजपर्यंत प्रशासनाने नदी शुद्धीकरणाकडे लक्षच दिले नाही. यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते. तलावात साचलेला गाळ काढण्याचा प्रयत्न झाला. यासोबतच नदी पात्रातील बेशरम काढण्याची गरज होती. प्रशासनाने नदी पात्र शुद्धीकरण मोहीम हाती घेतली असती तर काही अंशी पुराचा प्रकोप कमी करण्यात यश आले असते. परंतु प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न नद्यांसाठी होतांना दिसत नाही. (प्रतिनिधी)