शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

यवतमाळ-वाशिमसाठी ११ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:29 IST

लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : २१ लाख मतदार ठरविणार नवा खासदार, चंद्रपूर-आर्णीतही पहिल्याच टप्प्यात मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागले गेले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद हे विधानसभा मतदारसंघ येतात. शिवाय, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वणी, आर्णी हे विधानसभा मतदारसंघ मोडतात. उर्वरित उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभेत समाविष्ट आहे.लोकसभेच्या या तीन जागांसाठी जिल्ह्यात एकंदर २१ लाख २८ हजार १६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ११ लाख ५ हजार ३७० पुरुष तर १० लाख २२ हजार ७६४ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकंदर २४९१ मतदान केंद्र राहणार आहेत.यवतमाळ वाशीम लोकसभेकरिता ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील १२ लाख ५५ हजार २८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर वाशीम जिल्ह्यातील ६ लाख ३५ हजार ५४६ मतदार आहेत. अशा पद्धतीने एकंदर १८ लाख ९० हजार ८२९ मतदारांचा प्रतिनिधी म्हणून यवतमाळ-वाशीमचा खासदार निवडून जाणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता, राळेगाव २७९३१२, यवतमाळ ३७३६३८, दिग्रस ३१६७६८, पुसद २८५५६५, वाशीम ३४०८०२, कारंजा २९४७४४ अशी मतदारांची संख्या आहे.पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, आरडीसी ललितकुमार वºहाडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे आदी उपस्थित होते.२२ ठिकाणी वाहन तपासणी - एसपीआचारसंहितेचा कुठेही भंग होऊ नये यासाठी प्रशासनाची विविध पथके कार्यरत करण्यात आली आहे. जिल्ह्यात सीमावर्ती भागांमध्ये तब्बल २२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिली. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्र संवेदनशील असून मतदारांना कोणीही दारू, पैशाचे आमिष दाखविणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात असल्याचे ते म्हणाले.दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयजिल्ह्यातील ४ हजार ७८१ दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची सोय केली जाणार आहे. दिव्यांग, तसेच वृद्धांसाठी स्वतंत्र रांग असेल. दृष्टीहीन मतदारांसाठी बॅलेट युनिटवर ब्रेल लिपी असेल. त्यांच्या मार्गदर्शनासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती असेल. गरज पडल्यास दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरही पुरविली जाणार आहे. विशेष म्हणजे, अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी अ‍ॅप’ सुरू केला आहे. या अ‍ॅपवरून दिव्यांग मतदाराने आपली अडचण प्रशासनाला सांगितल्यास त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहन पाठविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, याच अ‍ॅपवरून दिव्यांगाला मतदार नोंदणीही करता येणार आहे.आचारसंहितेत मतदारच राजानिवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदार हाच खरा राजा राहणार आहे. कोणताही उमेदवार, राजकीय कार्यकर्ते आचारसंहितेचा भंग करीत असल्यास त्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकाला थेट आयोगाकडे करता येणार आहे. त्यासाठी ‘सी व्हिजिल’ हा मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचा फोटो त्यावर कोणीही अपलोड केल्यास १०० मीनिटांच्या आत भरारी पथक पोहोचून कारवाई करणार आहे.प्रशासनाला ‘सुगम’, उमेदवारांना ‘सुविधा’निवडणुकीच्या कामात नेमके कोणते, किती साहित्य लागेल, याची माहिती प्रशासनाला अद्ययावत मिळत राहावी, यासाठी सुगम हे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे. तर दुसरीकडे उमेदवारांनाही त्यांच्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ‘सुविधा’ हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. त्यावर लॉगीन केल्यास उमेदवारांना नामांकनापासून मतमोजणीपर्यंत ‘अपडेट’ राहता येणार आहे. विशेष म्हणजे, मतमोजणीच्या वेळी प्रत्येक फेरीत आपल्याला किती मते मिळाली, याचेही अपडेट मिळत राहणार आहे. निवडणूक खर्चासाठी प्रती उमेदवार ७० लाखांची मर्यादा असून त्यासाठी नामांकनापूर्वीच स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे.१८ मार्चपासून नामांकन प्रारंभ१८ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होईल. २५ मार्चच्या दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज भरता येणार आहे.२६ मार्चला अर्जांची छाननी होईल.२८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल, त्याच दिवशी चिन्हवाटप केले जाईल.११ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल.२३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.हिंगोलीमध्ये १८ एप्रिलला मतदानजिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे.सोशल मीडियावर वॉचमतदानाच्या ४८ तासापूर्वीच प्रचार थांबवावा लागणार आहे. त्यासोबतच सोशल मीडियातून होणाºया प्रचारावर विशेष वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग कमिटी’ जिल्ह्यात दाखल होणार आहे. उमेदवारालाही आपले सोशल मीडिया अकाउंट सर्टिफाईड करून घ्यावे लागणार आहे. नामांकनासोबतच आपली संपत्ती, पॅनकार्ड नंबर, इन्कमटॅक्स रिटर्न आदींसह आपल्यावरील गुन्ह्यांचीही माहिती जाहीर करावी लागणार आहे.डायल करा, यादी तपासाऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नसल्याचे कळल्याने अनेकांची अडचण होते. त्यावर मात करण्यासाठी यंदा प्रशासनाने ‘१९५०’ हा हेल्पलाईन नंबर सक्रीय केला आहे. तो डायल करून मतदाराला आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खातरजमा करता येणार आहे. यादीबाबत काही अडचण असल्यास या क्रमांकावरून समाधान केले जाणार आहे.