शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सहा गटांसाठी मतदान

By admin | Updated: February 21, 2017 01:20 IST

जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात मंगळवार, २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे.

आज भवितव्य मतपेटीत बंद : एक लाख ४७ हजार मतदारयवतमाळ : जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात मंगळवार, २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. यात एकूण ९९ उमेदवारांचे भवितव्य पणास लागले आहे.पहिल्या टप्प्यात ५५ गट व ११० गणांसाठी १६ फेब्रवारीला मतदान पार पडले. मात्र विडूळ-चातारी या गटातील आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सहा गट व १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडली होती. या गटांचे नव्याने आरक्षण काढण्यात आल्यानंतर आता उद्या तेथे मतदान घेतले जाणार आहे. यात कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव आणि विडूळ-चातारी गटांसह १२ गणांचा समावेश आहे.या सहा गटांपैकी तीन गट सामान्य महिलांसाठी आरक्षित आहे. त्यात कुंभा-मार्डी, वटफळी-अडगाव आणि लाडखेड-वडगाव यांचा समावेश आहे. उर्वरित तीन गट खुले आहेत. या सहा गटांमध्ये ३४ उमेदवार रिंगणात आहे. पंचायत समितीच्या १२ गणांमध्ये ६५ उमेदवार आहेत. या टप्प्यात १७९ मतदान केंद्र राहणार आहे. एक लाख ४७ हजार सहा मतदार आहेत. यात ७७ हजार ३९६ पुरूष, तर ६९ हजार ६०९ महिला मतदार आहेत.मतदानासाठी ७१६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी सुमारे ४०० पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. सर्व निवडणूक कर्मचारी आपापल्या केंद्रावर रवाना झाले आहे. (शहर प्रतिनिधी)सर्वाधिक मतदार घोन्सामध्येसहापैकी घोन्सा-कायर गटात सर्वाधिक २६ हजार ७९८ मतदार आहे. त्या खालोखाल विडूळ-चातारी गटात २६ हजार २८० मतदार आहेत. कुंभा-मार्डी गटात २५ हजार ७९१, देउरवाडी-सुकळी गटात २३ हजार २६२, लाडखेड-वडगाव गटात २२ हजार ७६४, तर वटफळी-अडगाव गटात सर्वात कमी २२ हजार १११ मतदार आहेत.महिलांचे पुरूषांना आव्हानदुसऱ्या टप्प्यातील सहापैकी तीन गट खुले आहे. या तीनपैकी वटफळी-अडगाव आणि लाडखेड-वडगाव या दोन खुल्या गटात महिला उमेदवारांनी पुरूष उमेदवारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.