शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत राजकीय गुणसूत्रेच जुळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:18 IST

राजकीय गरज म्हणून चार पक्ष सत्तेसाठी जिल्हा परिषदेत एकत्र आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची राजकीय गुणसूत्रे जुळली नाहीत. त्यामुळेच आज या ‘मिनी मंत्रालयात’ पदाधिकारीविरुद्ध अधिकारी असा जाहीर सामना पाहायला मिळतो आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी-अधिकारी वाद : समेट घडविणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राजकीय गरज म्हणून चार पक्ष सत्तेसाठी जिल्हा परिषदेत एकत्र आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची राजकीय गुणसूत्रे जुळली नाहीत. त्यामुळेच आज या ‘मिनी मंत्रालयात’ पदाधिकारीविरुद्ध अधिकारी असा जाहीर सामना पाहायला मिळतो आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींना राजकीय आखाड्यात उतरवून या पक्षाची नेतेमंडळी मात्र दूरूनच सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. वास्तविक त्यांनी तत्काळ मैदानावर येऊन हस्तक्षेप करीत पंचाची भूमिका वठविणे अपेक्षित आहे.भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा विविध विचारधारेचे चार पक्ष एकत्र येवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली असली, तरी प्रत्यक्षात संपूर्ण सूत्रे भाजपाकडे आहे. म्हणायला अध्यक्ष काँग्रेसचा आहे. परंतु महत्त्वाची भूमिका भाजपा वठविताना दिसत आहे. अध्यक्षांच्या मर्यादा आहेत. सभागृहातील कामकाजाच्या पद्धतीबाबत त्या अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्या जणू नामधारी ठरत आहे. अध्यक्षाचे रिमोट कुणाच्या हातात आहे, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते.अधिकारी व पदाधिकाºयांमधील वादामुळे जिल्हा परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वादामुळे जिल्ह्याच्या विकासात खोळंबा निर्माण झाला आहे. सत्ताधारी पदाधिकारी व सदस्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. सत्ताधाºयांना अधिकारी ऐकत नाही. यापूर्वी पालकमंत्र्यांनी एकदा बैठक घेवून समन्वयाचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा फार काही फायदा झालेला नाही.जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकाºयांवर हावी झाले आहेत. अधिकारी थेट आयुक्तांच्या दरबारात पोहोचतात, ते पाहता त्यांना प्रशासनाची मूकसंमती असल्याचे स्पष्ट होते. अधिकाºयांनी आयुक्तांपर्यंत घेतलेली झेप, हे सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. अधिकारी कोणत्या अधिकारात आयुक्तांकडे गेले, याचे राजकीयस्तरावर चिंतन होणे गरजेचे आहे.पदाधिकारी, सदस्य तज्ज्ञ नसतात, त्यांना वेळोवेळी विषयाची जाण करून देण्याची जबाबदारी अधिकाºयांची असते. पदाधिकारी-अधिकाºयांच्या या वादात जिल्हा परिषदेचे विकासाचे अडीच तास बेकार गेले आहे. आता या सर्वसाधारण सभेसाठी तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पदाधिकारी व अधिकाºयांच्या या वादात सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत सामूहिक बैठक घेवून तत्काळ मध्यस्थी करणे गरजेचे आहे. अन्यथा वाद पेटत राहील आणि जनसमस्या फाईलीतच राहतील.सभागृहाच्या सार्वभौमत्त्वालाच आव्हानअधिकाºयांनी सभागृहाच्या सार्वभौमत्त्वालाच आव्हान दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एखाद्या अधिकाºयाला दीड-दोन तास सभागृहात उभे केले जावूनही तो अधिकारी सभागृहाचे समाधान करू शकत नसेल, तर हे प्रशासनाचे अपयश ठरते. आपल्या अधिकाºयाचा पाणउतारा केला जात असताना सीईओंनी गप्प राहणे न समजण्यासारखे आहे. वास्तविक सदस्य व अधिकाºयांमधील वाद वाढत असताना त्यात हस्तक्षेप करण्याची जबाबदारी अध्यक्ष, सीईओंवर होती. परंतु दुर्दैवाने त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळेच आज जिल्हा परिषदेतील वाद थेट आयुक्तांपर्यंत पोहोचला. आत्ताच तोडगा न निघाल्यास हा वाद आणखी वरपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.