शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार ४३६ बालकांना पाजणार पोलिओ

By admin | Updated: April 2, 2017 00:33 IST

पोलिओ रोगाचे उच्चाटनासाठी तालुक्यात येत्या २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

वणी तालुका : वणी शहरात २७ व ग्रामीण भागात १५९ लसीकरण बुथची व्यवस्था वणी : पोलिओ रोगाचे उच्चाटनासाठी तालुक्यात येत्या २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी व यशस्वितेसाठी तहसीलदार रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी तालुकास्तरीय दक्षता समितीची सभा घेण्यात आली. या मोहिमेसाठी तालुक्यातील राजूर (कॉलरी), शिरपूर, कायर आणि कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रूग्णालय वणीच्या माध्यमातून पाच वर्षापर्यंतच्या वणी शहरातील सुमारे सात हजार ७७२ व ग्रामीण भागातील १० हजार ६६४ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. विशेष दक्षता म्हणून तालुक्यातील कोळसा खाणीच्या परिसरातील कोलडेपो आणि वस्त्या, चुनाभट्टी, कापसाचे जीन, गीट्टी क्रेशर, विटभट्टे, बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगाराची व स्थलांतरीत समुदयाच्या बालकांना पोलिओ लस देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाकडून तालुक्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेकरिता शहरात २७ व ग्रामीण भागात १५९ लसीकरण बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपपकेंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, नगरपरिषदेच्या शाळा, बालवाडी आदी ठिकाणी आणि प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी बसस्थानक, रेल्वे स्थानक, टोल नाके येथे पोलिओ लस पाजण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता सहा ट्रान्झिट टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच परप्रांतीय तथा स्थलांतरीत समुदायाच्या बालकांना लस देण्याकरिता सात मोबाईल टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओ लस पाजून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी एन.टी.खेरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक इंगोले, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिता बेरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)