शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

पोलिसांचेही अवैध धंदे !

By admin | Updated: June 3, 2015 00:09 IST

जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक या सारख्या अवैध धंद्यांमध्ये चक्क काही पोलिसांचीही ....

कारवाई करणार कोण ? : नातेवाईकांच्या नावाने प्रवासी वाहने यवतमाळ : जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक या सारख्या अवैध धंद्यांमध्ये चक्क काही पोलिसांचीही भागीदारी आहे. ही बाब कुणालाही सहजासहजी खरी वाटणार नाही, परंतु हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र या धाडी टाकताना काही पोलीस कर्मचाऱ्यांचे या धंदेवाईकांशी एवढे सलोख्याचे संबंध निर्माण झाले की आता त्यांनीच भागीदारीत हे व्यवसाय सुरू केले आहे. अर्थात ही भागीदारी कुठेही रेकॉर्डवर नसल्याने कुणालाही सिद्ध करणे शक्य नाही. मात्र ही भागीदारी पोलीस खात्यात कुणापासूनच लपलेली नाही. खाकी वर्दीची भागीदारी असलेल्या या धंद्यांकडे धाड पथक सहसा जात नाही. यवतमाळ शहरातील अनेक धंद्यांमध्ये खाकी वर्दीची अघोषित पार्टनर शिप आहे. कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कौटुंबिक सदस्य, नातेवाईक व विश्वासू व्यक्तींच्या नावावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने घेतली आहेत. या वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सर्रास केली जाते. अन्य वाहनांना त्यापोटी हप्ता द्यावा लागतो. मात्र पोलिसांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाहनांकडून हप्ता घेतला जात नाही. अशा वाहनांचे सर्वाधिक प्रकार हे पुसद उपविभागात आहेत. यवतमाळातही ही संख्या कमी नाही. विशेषत: वाहतूक शाखेत नोकरी केलेल्यांनी मोठ्या प्रमाणात अशी वाहने घेतली गेली आहे. अवैध धंद्यांमध्ये भागीदारी असलेले हे पोलीस कर्मचारी खात्यात गुन्हे शाखा, डीबी पथक, वाहन चालक, ट्रॉफिक अशा की-पोस्टवर आहेत. त्यामुळे प्रत्येकच हालचालींची त्यांना खबर असते. योग्यवेळी ते धंदे-वाहतूक बंद ठेवण्याची खबरदारीही घेतात. ढाबे, बार, बीअर शॉपी, वणी विभागात कोळसा वाहतूक या प्रकारात ही भागीदारी आहे. स्वत:च अवैध व्यवसायात असल्याने हे पोलीस कर्मचारी आपल्या अन्य स्पर्धक व्यावसायिकांना खाकी वर्दीच्या आडून त्रास देताना दिसतात. या व्यवसायिकांविरुद्ध खोट्या तक्रारी करणे, आपल्या सहकारी पोलिसांना सांगून धाडी घालणे, हेतुपुरस्सर कठोर कारवाई करणे, दमदाटी करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविणे असे प्रकार सर्रास पहायला मिळतात. शहरातील एका बीअर शॉपीचा वाद काही दिवसांपूर्वी येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचला तेव्हा या वादामागे आपल्याच एका पोलीस कर्मचाऱ्याची व्यावसायिक स्पर्धा असल्याचे व त्यातूनच खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे आढळून आले होते. हा कर्मचारी आजही महत्वाच्या शाखेत कार्यरत आहे. राजकीय संबंधाच्या बळावरच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात आजही जुगार अड्डे, क्रिकेट सट्टा, कोळशाची चोरी व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक हे प्रकार सुरु आहे. यामुळेच कुठेही ठोस कारवाई होताना दिसत नाही. (जिल्हा प्रतिनिधी) दारू, जुगार, अवैध वाहतूक, बार-ढाबे, कोळसा, बीअर शॉपीत भागीदारी काही दिवसांपूर्वी शहरात उघडकीस आलेल्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणातही अशीच भागीदारी पुढे आली. या घटनांमागे एका पोलीस कर्मचाऱ्याचे नेटवर्क असल्याची चर्चा यावेळी होती. हा कर्मचारी आजही कायम आहे. एवढेच नव्हे तर एका पोलीस अधिकाऱ्याशी भागीदारीत जुगार अड्डा चालविणाऱ्या व्यावसायिकानेच या मंगळसूत्र चोरीतील बहुतांश सोने खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. या अवैध धंद्यांमध्ये केवळ काही पोलीसच आहे, असे नव्हे तर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही गुंतले असल्याची माहिती आहे.