शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वॉरंट प्रवास विम्याला संरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:13 IST

शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे.

ठळक मुद्देदावा करू शकणार नाही‘एसटी’ला साहाय्यता निधी नाही

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे. शिवाय पोलीस विभागाकडूनही यासाठी ठोस असे प्रयत्न झाले नाही. या व्यवहाराविषयी पोलिसांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.पोलिसांना शासकीय कामानिमित्तचा प्रवास ‘एसटी’नेच करावा लागतो. आरोपींना न्यायालयात घेऊन जाणे, मेडिकल, प्रशिक्षण, आरोपींचा शोध या कामांसाठी हा प्रवास घडतो. यासाठी पोलिसांच्या हाती रोख रक्कम दिली जात नाही. वॉरंट अर्थात कॅशलेस व्यवहार. पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे. एखाद्या पोलिसाचे नाव आणि सोबत असलेल्या इतर व्यक्तींची संख्या वॉरंटवर लिहायची (अशोक + पाच) अर्थात सहा प्रवासी. वॉरंट दाखविला की, तिकीट फाटले आणि ते प्रवासी झाले.मात्र ‘एसटी’ महामंडळाने सुरू केलेल्या ‘हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी’ योजनेत वॉरंटच्या प्रवाशाला दूर ठेवले गेले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तिकीटामागे प्रवास भाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जातो.प्रवास भाड्याचे शंभर रुपये आणि एक रुपया अपघात सहायता निधी असे एकूण १०१ रुपयांचे तिकीट प्रवाशाला दिले जाते. बसला अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये त्याच्या कुटुंबाला महामंडळाकडून दिले जाते. मात्र यापासून वॉरंटवर प्रवास करणारे दूर ठेवण्यात आले आहे.वॉरंटवर अपघात सहायता निधीची रक्कम नोंद केली जात नाही. पाच व्यक्तींची नोंद असल्यास प्रती प्रवासी १०० रुपये या प्रमाणे ५०० रुपयांचेच वॉरंट पास केले जाते. त्यावर पाच प्रवाशांमागे सहायता निधी घेतला जात नाही. निधीच घेतला जात नाही तर अपघात विम्याचे संरक्षण द्यायचे कसे, हा एसटीचा प्रश्न आहे. सरकारी कामासाठी प्रवास करीत असताना विमा संरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार पोलिसांना चांगलाच खटकला आहे. लोकवाहिनीकडून सर्व प्रवाशांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

‘शिवशाही’तही जागा नाहीवॉरंटवर प्रवास करणाऱ्यांना ‘शिवशाही’तही जागा दिली जात नाही. वास्तविक जेवढे तिकीट असेल तेवढे तिकीट वॉरंटवर घेता येते. परंतु शिवशाहीने वॉरंट स्वीकारणार नाही, असा जणू पणच केला आहे. शिवशाही सुरू केल्याने महामंडळाने लांबपल्ल्याच्या इतर बसेस बंद केल्या आहे. फेऱ्या कमी झाल्याने वॉरंटने प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागते. शिवशाही नेमक्या प्रवाशांना घेऊन जाते. पोलीस अधिकारी, कर्मचारी हतबल होऊन बसकडे पाहत उभे राहतात. ही गैरसोय पोलीस विभागाकडूनही दुर्लक्षित आहे.

टॅग्स :Policeपोलिस