शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे आजपासून ‘आॅपरेशन मुस्कान’

By admin | Updated: July 1, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील १८ वर्षाखालील मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे.

एसपींची पत्रपरिषद : हरविलेल्या मुलांचा शोध घेणार, विभागीय मुख्यालय यवतमाळात यवतमाळ : जिल्ह्यातील १८ वर्षाखालील मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. याची सुरूवात १ जुलैपासून करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले. केंद्रीय गृहसचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. ही संकल्पना सर्वप्रथम गाझियाबाद व झारखंड पोलिसांनी राबविली. यामध्ये गाझियाबाद येथील हरविलेल्या २२७ मुलांचा तर झारखंड येथील १४७ मुलांचा शोध लागला. याची दखल घेऊन केंद्रीय गृहसचिवांनी संपूर्ण राज्यांनाच या पद्धतीचे अभियान राबविण्याची सूचना दिली. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी ‘अ‍ॅन्टी ह्यूमन ट्रॅफीकींग युनिट’ (एएसयू) स्थापन करण्यात येत आहे. यवतमाळ येथे यवतमाळसह अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्याचे युनिट राहणार आहे. या जिल्ह्यातील चार महिन्यात हरविलेल्या मुलांची १८ प्रकरणे असल्याचे सिंग यांनी सांगितले. १ ते ३० जुलै या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. यामध्ये समाजातील सर्वच घटकांचे योगदान घेण्यात येणार आहे. बस्थानक, रेल्वे प्लॅटफॉर्म, धार्मिकस्थळे यांसारख्या ठिकाणी आढळणाऱ्या बेवारस लहान मुलांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. शिवाय १८ वर्ष वयोगटाखालील मुले हरविल्यास तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात २०१० ते २७ मे पर्यंत ५४२ मुलं-मुली हरविले होते. यापैकी ५२६ मुल-मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. केवळ १६ प्रकरणांचा तपास सुरू आहे. या अभियानासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला जमादार व दोन पुरूष जमादार यांचे पथक तयार करण्यात आले आहे. यात चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रीयास्तरावर रिवार्ड देण्यात येणार आहे, जेणेकरून हरविलेल्या मुलांबाबत शासन जे अभियान राबवित आहे, त्यामध्ये सर्वांनी परिणामकार कामगिरी बजवावी, असा हेतू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी दिली. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पुज्जलवार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)