शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

शेतकऱ्यांचा मुलगा व मुलगी झाले पोलीस उपनिरीक्षक

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते.

आर्णी : वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते. आणि त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. अशोक जेता राठोड रा.आंबोडा या शेतकऱ्याचे मुलगा व मुलगी हे दोघेही पोलीस उपनिरीक्षक झाले.अशोक राठोड यांच्या मुलांनी आपल्या शेतकरी पित्याचे स्वप्न पूर्ण केले. दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत घेवून हे यश संपादन केले. वडील शेतकरी असल्याने त्यांचे शिक्षण आर्णी येथे काकाकडे झाले. काका म.द. भारती शाळेत आहेत. तर बहीण नम्रता ही उमरखेडला पोलीस असलेल्या काकांकडे शिक्षणासाठी होती. भाऊ विकास याने प्राथमिक शिक्षण आर्णीला तर पुढील शिक्षण पुसद व चंद्रपूरला पूर्ण केले. एम.एस्सी. बी.एड. केल्यानंतर विकासने प्राध्यापक म्हणून चंद्रपूरला एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर ही नोकरी कायम ठेवण्यासाठी त्याला पैसे मोजावे लागणार होते. आपण हे करू शकणार नाही, याची त्याला जाणिव झाल्याने त्याने पीएसआयसाठी तयारी सुरू केली, तर दुसरीकडे बहीण नम्रता हिने बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकांप्रमाणे आपणही पोलीस खात्यात जावे यासाठी पीएसआय होण्याचे ठरविले. दोन्ही भावंडांनी सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. २०१३ मध्ये दोघेही परीक्षेला बसले. आणि उत्तीर्ण होवून त्यांची निवडही झाली. यामध्ये विकास महाराष्ट्रातून व्हीजे प्रवर्गातून १३ व्या स्थानी तर नम्रता ही सातव्या स्थानी होती. या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय काका, काकू, आई, वडील व शिक्षक यांना दिले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलेही कठोर परिश्रमाने इतरांप्रमाणेच यश संपादन करू शकतात, हे या दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. (शहर प्रतिनिधी)