शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मानसिक छळ होत असल्यानं आत्महत्या करतोय! 'त्या' व्हिडीओची पोलीस चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 15:13 IST

महाविद्यालय प्रशासनाने आराेप फेटाळले

यवतमाळ: येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यात प्राध्यापकाने संस्थेचे सचिव व प्राचार्यावर गंभीर आराेप केले. हा व्हिडीओ व्हायरल हाेताच ग्रामीण पाेलिसांचे पथक महाविद्यालयात पाेहाेचले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्राध्यापकाचा जबाब नाेंदवला असून पुढील चाैकशी सुरू आहे.सहाय्यक प्राध्यापक माे. वसीम अब्दुल कादर हे केमेस्ट्री हा विषय शिकवितात. त्यांनी शनिवारी आत्महत्या करण्यापूर्वी संस्थेचे सचिव शीतल वातिले व प्राचार्य यांच्याकडून मानसिक छळ केला जाताे, वेतन वेळेवर दिले जात नाही, काेणतेही कारण नसताना कारणे दाखवा नाेटीस बजावून उलट-सुलट विचारपूस केली जाते, असे आराेप व्हायरल केलेल्या व्हिडीओतून केले.  दरम्यान, सदर प्राध्यापकाला महाविद्यालयातील प्रयाेगशाळा परिचराने आत्महत्या करण्यापासून राेखले. ताेपर्यंत त्या प्राध्यापकाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. याची माहिती ग्रामीण पाेलिसांना मिळताच त्यांनी जगदंबा महाविद्यालय गाठले. तेथे त्या प्राध्यापकाची चाैकशी करत जबाब नाेंदवून घेतला. प्राध्यापकाच्या आराेपावरून काेणती नाेंद घ्यायची, याबाबत विधी अधिकाऱ्याकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले.महाविद्यालय प्रशासनाने या घटनेसंदर्भात खुलासा करताना प्राध्यापकाने केलेले सर्व आराेप फेटाळून लावले. सदर प्राध्यापक २५ सप्टेंबर राेजी काेणतीही पूर्वपरवानगी न घेता काॅलेज साेडून गेल्याने याबाबत काॅलेज प्रशासनाने विचारणा केली. प्रा. माे वसीम अब्दूल कादर यांनी वेतनाबाबत केलेले आराेपही तथ्यहीन असल्याचे संस्था सचिव शीतल वातिले यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्या