शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय राठोड टोळीच्या शोधात पोलीस नागपुरात

By admin | Updated: June 13, 2017 01:16 IST

कंत्राटदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात अक्षय टोळीच्या मागावर यवतमाळ पोलीस असून गत काही दिवसांपासून ...

अपहरणाचे प्रकरण : शहर पोलिसांचे पथकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कंत्राटदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात अक्षय टोळीच्या मागावर यवतमाळ पोलीस असून गत काही दिवसांपासून टोळी विरोधी पथक, शहर पोलीस ठाण्यातील पथक नागपुरात तळ ठोकून आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात शहर पोलिसांनी सात जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले आहे. कुख्यात अक्षय राठोड बाहेर आल्यानंतर त्याने आठवडाभरातच खंडणीसाठी सचिन किसनराव मांगुळकर (३३) रा. चांदोरेनगर यांचे अपहरण करून बाभुळगाव येथील त्याचा सहकारी अनिकेत गावंडे यांच्या घरात डांबून बेदम मारहाण केली. सुदैवाने यातून कशीबशी कंत्राटदाराची सुटका झाली. तेव्हापासून पोलीस अक्षय राठोड टोळीच्या मागावर आहे. या टोळीचा भविष्यातील उद्रेक वाढू नये म्हणून पूर्णत: बिमोड करण्यासाठी पोलिस प्रयत्नात आहेत. त्यासाठी संपूर्ण कायदेशीर आयुधाचा वापर करण्यावर जोर आहे. या टोळील बगीरा, करण, पोपट व इतर दोघांचा पोलिसांना शोध आहे. एका कारवाईत अनिकेत गावंडे नागपूर येथील सोनेगाव पोलिसांच्या कारवाईत अडकल्याची माहिती आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक नागपूरकडे रवाना झाले आहे. अनिकेत गावंडेवरही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. अक्षय कारागृहात गेल्यानंतर स्थानिक नेटवर्क अनिकेतच सांभाळत असल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. अनिकेत हाती लागल्यास संपूर्ण टोळीलाच जेरबंद करण्यात यश येईल, असे सांगितले जात आहे. तर टोळी विरोधी पथकाकडून मिळणारी ट्रिमेंटच्या भितीतून अनिकेतनेच सोनेगावात आर्र्म अ‍ॅक्ट लावून घेतल्याचीही चर्चा आहे. गुन्हेगारीचा बीमोड करणारयवतमाळ शहरात गत काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांनी डोके वर काढले आहे. या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून अक्षय टोळीला जेरबंद करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांतर्फे केला जात आहे.