शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांचा ‘प्रतिसाद अ‍ॅप’

By admin | Updated: March 29, 2016 03:33 IST

संकटात अडकलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मागता यावी, यासाठी जिल्हा पोेलीस दलाने अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी

यवतमाळ : संकटात अडकलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मागता यावी, यासाठी जिल्हा पोेलीस दलाने अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी ‘प्रतिसाद अ‍ॅप’ अ‍ॅक्टीवेट केला आहे. यावरून संकटाची चाहूल लागताच परिसरातील पोलिसांकडून काही मिनिटातच मदत मागविता येणार आहे. एका क्लिकवर पोलीस धावून येतील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पत्रपरिषदेत दिली.पोलीस महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. महिला, मुुली यांच्या सुरक्षेसाठी हा अ‍ॅप आहे. अ‍ॅन्ड्रॉईड फोन वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला याचा उपयोग करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरमधून ‘प्रतिसाद (एएसके)’ अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि कॅपाची कोड टाकून रजिस्टर होता येते. या अ‍ॅपवर संकटकाळी मदत मागविण्यासाठी जवळच्या तीन नातेवाईकांचा मोबाईल क्रमांकही लिंकअप करता येते. पोलिसांसोबतच या नातेवाईकांनाही तुम्ही संकटात असल्याची सूचना काही क्षणात मिळणार आहे. अतिशय कमी केबी असलेल्या इंटरनेटवरही अ‍ॅप सहज वापरता येते. तुम्ही संकटात असताना प्रतिसाद आस्कवर टच करताच तीन किलोमीटर परिसरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याला सूचना जाणार आहे. या परिक्षेत्रात कुणी नसल्यास दहा किलोमीटर परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर सूचना जाणार आहे. जीपीएस सिस्टीममुळे तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणावर आहे, याची माहिती पोलिसांकडे जाणार आहे. सध्या जीपीएस अप्लिकेशन असलेल्या २२९ पोलीस अधिकारी-कर्मचारी जिल्ह्यात आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यभर अ‍ॅप काम करणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक सुगत पुंडगे, रचना नरांजे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)