रंजनकुमार शर्मा : पत्रपरिषदेत माहितीयवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील ३00 शिपाई पदासाठी ५ मे पासून उमेदवारांना अर्ज मागविण्यात आले होते. आता शुक्रवार ६ जूनपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली. तसेच ही भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक असून व्हिडीओ चित्रीकरणात होत आहे. त्यामुळे कुण्याही अमिषाला आणि दलांलाच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले. ३00 पोलीस शिपाई पदासाठी होत असलेल्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एकूण आठ हजार ३३७ उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यापैकी आठ हजार २४ अर्ज वैद्य ठरले. ६ जूनपासून शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात होत आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी एक हजार पाचशे उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ७ जुनला २ हजार ५00, ८ जूनला २ हजार ६00 आणि ९ जूनला एक हजार ७00 महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. पुरूष उमेदवारांसाठी १00 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, पुलअप हे क्रीडा प्रकार घेण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी १00 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी या चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यासाठी १00 गुण ठेवण्यात आले आहे. तर लेखी परीक्षेसाठी १00 गुण आहेत. पावसाळा असल्याने एखादवेळी वातावरणात बदल होवून यामध्ये व्यत्यय येवू शकतो त्यामुळे वेळापत्रकात फेरबदल केला जाईल, असे रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. १0 जून हा दिवस अतिरिक्त ठेवण्यात आला आहे. शारीरिक क्षमता चाचणी पळसवाडी येथील पोलीस मैदानात होणार असून १५ जूनला सकाळी ९.३0 वाजता लेखी परीक्षाही तेथेच घेतली जाणार आहे. भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी ३00 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. शिवाय व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. भरतीमध्ये उमेदवारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवूून त्यांची फसवणूक करणारे सक्रिय होतात. अशा स्थितीत प्रत्येकाने दक्ष राहून त्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक यांना द्यावी असे आवाहन रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शुक्रवारपासून पोलीस भरती
By admin | Updated: June 5, 2014 00:03 IST