शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित ‘पीजीआर’ साठ्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:31 IST

प्रतिबंधित पीजीआर (प्लांट ग्रोथ रिझ्यूलोशन) अर्थात कृषी संजीवकाच्या गोदामावर येथील दारव्हा मार्गावरील तिरूपतीनगरात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धाड टाकली.

ठळक मुद्देतिरूपतीनगरात गोदाम : वाहन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रतिबंधित पीजीआर (प्लांट ग्रोथ रिझ्यूलोशन) अर्थात कृषी संजीवकाच्या गोदामावर येथील दारव्हा मार्गावरील तिरूपतीनगरात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धाड टाकली. या ठिकाणी असलेला प्रतिबंधीत साठा वाहनातून बाहेरगावी हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या.कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा प्रकरणानंतर जिल्ह्यात पोलीस आणि कृषी विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. तिरूपतीनगरातील एका घरात मोठ्याप्रमाणात कीटकनाशकांचा साठा असल्याची गोपनीय माहिती वडगाव रोड पोलिसांना मिळाली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार आयरे यांनी पथकासह धाड टाकली. त्यावेळी एका घरातून वाहनद्वारे प्रतिबंधित पीजीआर हलविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी प्रतिबंधीत पीजीआर भरलेले वाहन वडगाव रोड ठाण्यात आणले. या प्रकरणाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. त्यावरून पुढील तपास सुरू होता. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात कोणतीही नोंद घेण्यात आली नव्हती.राज्य शासनाने ३ आॅक्टोबर रोजी पीजीआरवर बंदी घातली आहे. यावर्षी फवारणीतील विषबाधेला पीजीआर जबाबदार धरले जात आहे. हा कीटकनाशक विक्रीचा एक ट्रॅप असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तिरूपती नगरात पीजीआर तयार करून त्याची विक्री केली जात होती. याची खबरबात कोणत्याच यंत्रणेला लागली नाही. ‘परफेक्ट-जी पॉवर ग्रो’ या नावाने उत्पादन ग्रीन पॉवर अ‍ॅग्रोटेक कंपनीकडून तिरूपतीनगरात तयार केल्याचे पीजीआरच्या बॉक्सवर नमुद केले आहे. आता या प्रतिबंधित पीजीआरची निर्मिती व विक्री करणाºया कंपनीवर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.