शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

पोलीस गस्त टपरी चालकांच्या मुळावर

By admin | Updated: July 16, 2014 00:28 IST

स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे.

बंद करण्यावर चार्लीचा भर : स्थानिक पोलिसांचा जोर मात्र दुकाने उघडण्यावरयवतमाळ : स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी त्यांची व्यावसायिक आणि ग्राहकांशी वागण्याची पध्दत चूकीची आहे. तर स्थानिक पोलीस स्वत:च्या जिभेचे चोचले त्यातही विनामूल्य भागविण्यासाठी चार्ली पथकाने बंद केलेली दुकाने उघडायला लावतात, हे विशेष!वर्षभरापासून यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हद्दीत सुरू असलेले जबरी चोरी व घरफोडीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. चोरट्यांना हुडकून काढा, त्यांना चोरीतील मुद्देमालासह अटक करा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून यवतमाळ शहर, वडगाव रोड, स्थानिक गुन्हे शाखा, चार्ली पोलीस पथक यांची दररोजच कानउघाडणी केजी जाते. मात्र एकाही घटनेचा छडा लावण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. त्यामध्ये यश येत नसले तरी या घटनांना आळा बसावा, म्हणून आता रात्रगस्त नित्यनेमाने केली जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे आणि चार्ली पोलीस पथक रात्रीदरम्यान शहरात गस्त घालतात. चार्ली पोलीस पथकाकडून व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याबरोबरच संशयित आणि मद्यपींची चौकशी केली जाते. विशेष करून टपऱ्या बंद करून नागरीकांना घराकडे परतवून लावण्याकडे त्यांचा भर असतो. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. मात्र हे करीत असतानाच अनेक प्रतिष्ठीत नागरिकांशी पथकातील कर्मचारी असभ्य वर्तन करतात. त्यांना शिविगाळ केली जाते. टपरी चालकांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे चार्ली पोलीस पथकाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन आता बदलत चालला आहे. उगाच वैर कशाला म्हणून टपरी चालक आपले दुकान गुंडाळतात. घराकडे निघण्याच्या बेतात असतानाच स्थानिक पोलिसांची गस्ती पथक तेथे पोहोचते. तसेच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी बंद केलेले दुकान उघडायला लावतात. विशेष असे की, बहुतांश पोलीस कर्मचारी या टपरीचालकांना पैसे न देताच निघून जातात. पुन्हा दुकान बंद करताना चार्ली पोलिसांच्या हाती लागले की, शिवीगाळ, वाहनातील चाकांची हवा सोडणे, चालान अशा प्रकारांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे टपरी चालकांची स्थिती अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)