शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:32 IST

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली.

ठळक मुद्देपांढरकवडा ठाणेदाराला मुदतवाढ : कळंब, शिरपूर, मुकुटबनमध्ये चेंज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यात पांढरकवड्याचे ठाणेदार असलम खान यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असताना असलम खान यांना मिळालेली मुदतवाढ पाहता ‘गृह’विभाग त्यांच्यावर ‘प्रसन्न’ झाल्याचे मानले जाते. येथील पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची अमरावती ग्रामीण पोलीस दलात नेमणूक करण्यात आली आहे. कळंबचे ठाणेदार बबन कऱ्हाळे यांना वाशिमला पाठविण्यात आले. मुकुटबनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांची बुलडाणात बदली करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्यात आणण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत.शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांना अमरावती ग्रामीण, सुभाष दुधाळ बुलडाणा, सुरज बोंडे अमरावती ग्रामीण, बाळू जाधव वाशिम, दिलीप मसराम यांची अकोल्यात बदली करण्यात आली आहे. धीरज चव्हाण यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. अमरावती ग्रामीणमधून सतीश चवरे, निलेश सुरडकर, संदीप येकाडे हे तीन सहायक पोलीस निरीक्षक जिल्ह्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या. अमरावती ग्रामीणचे सुरेश कन्नाके, मयूर तेलंग, विजय मुसनवाड, अकोल्याचे संतोष केदासे, नितीन बलीगवार या फौजदारांना यवतमाळ जिल्ह्यात नेमणूक देण्यात आली आहे.ठाणेदारकीसाठी फिल्डींगमहासंचालक व महानिरीक्षक स्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्तरावरील नियुक्त्यांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात बाहेरुन नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी महत्वाचे ठाणे मिळविण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी चालविली आहे. तर कनिष्ठ पोलीस अधिकारी सोईच्या नियुक्त्यांसाठी प्रयत्नरत आहेत. यातील काहींनी बदली रद्द करण्यासाठी तर कुणी मुदतवाढ मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.

टॅग्स :Transferबदली