शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे आंदोलन पोलिसांनी उधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:16 IST

वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने आयोजित मुंडण आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने अतिशय शांतपणे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी उधळून लावल्यामुळे काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा निषेध केला.

ठळक मुद्देसहा जणांचे मुंडण : कार्यकर्ते स्थानबद्ध, सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने आयोजित मुंडण आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने अतिशय शांतपणे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी उधळून लावल्यामुळे काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा निषेध केला.वणी व झरी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीसाठी यापूर्वी काँग्रेस सेवादलाच्यावतीने टाकळी ते टाकळी पदयात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा प्रशासनाला स्मरणपत्रेही देण्यात आली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गुरूवारी मुंडण आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार येथील तहसील कार्यालय परिसरात दुपारी १ वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. या आंदोलनादरम्यान मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे ५१ कार्यकर्ते मुंडण करणार होते. परंतु सहा कार्यकर्त्यांचे मुंडण होत नाही, तोच पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन उधळून लावले. त्यामुळे आंदोलनकर्त्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी जवळपास २५ कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांच्या या कृतीचा काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजीव कासावार यांनी केले. या आंदोलनात माजी आमदार वामनराव कासावार, मोरेश्वर पावडे, अनिल देरकर, राजीव येल्टीवार, रामन्ना येल्टीवार, भुमारेड्डी बाजन्लावार, मुन्ना कुरेशी, डॉ.भास्कर महाकुलकर, रमेश येरणे, प्रदीप बोनगीरवार, ओम ठाकूर, राकेश खुराणा, विवेक मांडवकर, प्रमोद वासेकर, विलास भोंगळे, गणेश पायघन, डॅनी सँड्रावार, डेवीड पेरकावार, संजय खाडे, राजू येल्टीवार, शेखर बोनगीरवार, झिंगू पिंपळशेंडे, विकेश पानघाटे, प्रमोद निकुरे, सुनील वरारकर, रवी कोटावार, धनराज देवतळे, महादेव दोडके, रसुल खान पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार वजाहत मिर्झा यांनी दुष्काळ परिस्थितीचे पूर्वालोकन करण्यासाठी विनंती केली होती. ही विनंती मान्य करून फेरसर्व्हेक्षणाचे आदेशही देण्यात आले. तसेच हे दोनही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. शासनाने टाळाटाळ न करता तातडीने हे दोनही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाने केली आहे.तर शासनाची तेरवी करूवणी, झरी तालुक्यात दुष्काळामुळे नागरिक व शेतकºयांची अतिशय बिकट अवस्था आहे. अशा परिस्थितीत हे दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास आजपासून १३ दिवसानंतर शासनाची तेरवी केली जाईल, असा इशारा राजीव कासावार यांनी दिला.