शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

खूनसत्रावर उपचाराची नस पोलिसांना सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:27 IST

शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यात १४ खून : नवख्यांची मानसिकता ओळखण्यात अपयश

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे. मात्र खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. पोलीस यंत्रणेच्या अनेक मर्यादा या खून सत्राने उघड झाल्या. प्रत्येक खुनात नवीनच आरोपी असतात. नवख्या आरोपींची मानसिकता ओळखण्यात अपयश आल्याने पोलिसांना उपचाराची नसही सापडत नाही.यवतमाळ शहराची ओळख गुन्हेगारांचे शहर अशी होऊ लागली आहे. येथील गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधिमंडळातही गाजला. शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. एकट्या यवतमाळ शहरात जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंत तब्बल १४ खून झाले. भर रस्त्यात, वर्दळीच्या ठिकाणी खुनाच्या घटना घडत आहे. या खुनांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले आहे. खून झाला की पोलीस आरोपींना तातडीने अटक करतात. पुढची कारवाई होते. परंतू खुनाचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांकडे कोणतेच नियोजन दिसत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही म्हणून पोलीस हात वर करतात. नवघ्याना कसे ओळखायचे, कुणाचे कोणाशी वैर आहे याची माहिती मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या घटना सातत्याने वाढत आहे.शहरात घडलेल्या प्रत्येक खुनामागील कारणांची मिमांसा केली तर त्यात वेगवेगळी कारणे आढळून येतात. सावकारीपासून भाईगिरीपर्यंत सर्वच कारणांचा यात समावेश आहे. अल्पवयीन आणि नवयुवकही दिवसाढवळ्या खून करण्यात मागे नाही. यवतमाळ शहरातील गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी पोलिसांचे योग्य नियोजनच दिसत नाही. विधिमंडळात गुन्हेगारीची मुद्दा गाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले.काही दिवस वाहनधारकांची तपासणी केली. मात्र आता ही मोहिमही थंड बस्त्यात पडली आहे. खून होताच मात्र आरोपींनाही अटक करतोच की असे अफलातून उत्तर दिले जाते. पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून मुक्कामी कर्मचारी आहे. त्यांना प्रत्येक हालचालीची माहिती सुद्धा मिळते. परंतु कारवाई करण्याची मानसिकता नाही. केवळ आपले पद कायम ठेवण्यासाठी तजविज केली जाते. याला बाहेरुन आलेल्या अधिकाऱ्यांनाही भक्कम साथ दिली जाते. जमादाराकडे बीट सोपविण्यात येते. त्यावर अधिकाºयाचे नियंत्रण असते. परंतू प्रत्यक्षात कोणाचे लक्ष दिसत नाही. दिलेला कार्यक्रम राबवून सोपस्कार पूर्ण करण्याची मानसिकता झाली आहे. याच कारणामुळे खुनाच्या सत्रावर उपचाराची नस पोलिसांच्या हाती सापडत नाही.नव्या आकृतीबंधाची गरजशहर पोलीस ठाण्यानंतर अवधूत वाडी ठाणे तयार झाले. त्यानंतर लोहारा ठाण्याचीही निर्मिती झाली. मात्र येथे पुरेसा अधिकारी-कर्मचारी वर्ग नाही. शहराची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात आहे. त्या तुलनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी नाही. मंजूर असलेला आकृतीबंध हा १५ वर्षापूर्वीचा आहे. त्यातही अनेक पदे रिक्त आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज आहे. राजकीय मानसिकता नसल्याने नवीन आकृतीबंध तयार होत नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा