शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये पोलीस वर्धापन दिन सप्ताह

By admin | Updated: January 5, 2016 02:54 IST

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्या पोलीस दलाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. पोलीससुद्धा माणूसच असून

पुसद : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्या पोलीस दलाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. पोलीससुद्धा माणूसच असून पोलीस खात्याबाबतची खरी माहिती शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणे व जनतेशी सुसंवाद साधत शस्त्रास्त्र प्रदर्शन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याच्या उद्देशाने पुसद शहर पोलीस स्टेशन, वसंतनगर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा पुसद यांच्यामार्फत २ ते ८ जानेवारीपर्यंत पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत येथील छत्रपती शिवाजी चौकात जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस बॅन्ड पथकाने केलेल्या प्रदर्शनाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. येथील शहर पोलीस स्टेशन व वसंतनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सप्ताहाच्या प्रारंभी शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात ‘पोलीस मित्र’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ठाणेदार अनिल कुरळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, मधुकर चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी वाहतुकीचे नियम, पोलिसांची कामे, पोलीस खात्याबाबतची माहिती, पोलिसांसोबतचे गैरसमज आदी विविध विषयांवर माहिती देण्यात आली व जनतेशी सुसंवाद साधण्यात आला. या सप्ताहात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांतर्फे माहिती देण्यात येणार असून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शहरचे पालीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी दिली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय डहाके, पोलीस उपनिरीक्षक बंडू जाधव, जमादार अशोक तडसेसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)