लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पांढरे सोने विकण्यासाठी नेर येथे खरेदी केंद्र नाही. सुरु होण्याची कुठलीही चिन्हे नाही. पैशाची गरज असताना विकू शकत नाही. घरातील साठवणूक जोखमीची आहे. या सर्व परिस्थितीमुळे तालुक्यातील कापूस उत्पादकांची कोंडी झाली आहे.कापसाचे उत्पादन घेणारा नेर तालुक्यात मोठा शेतकरी वर्ग आहे. बहूतांश शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. लगतच्या दारव्हा येथील खरेदी केंद्र सुरू झाले आहे. याठिकाणची कापूस खरेदी मर्यादा अतिशय कमी आहे. दोन तालुक्यांच्या कापूस खरेदीची क्षमता दारव्ह्यात नाही. यामुळे नेर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.उन्हाळ््याचे दिवस आहे. या कालावधीत कापसाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. या परिस्थितीत शेतकºयांनी जोखीम स्वीकारुन कापूस घरात भरून ठेवला आहे. काही ठिकाणी खरेदी सुरू झाली आहे. नेर येथे का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची सुविधा नाही. याच कारणाने याठिकाणी खरेदी सुरू झालेली नाही. दारव्हा किंवा यवतमाळ येथे कापूस विकण्यासाठी नेण्याचा सल्ला दिला जातो.यवतमाळला कापूस विकण्यासाठी जाणे शेतकºयांना परवडत नाही. याशिवाय लॉकडाऊनमुळे ही बाब शक्यही नाही. दारव्हा येथे केंद्र सुरू होऊनही उपयोग नाही. या ठिकाणची खरेदी क्षमता मर्यादित आहे. यात वाढ करून नेरसाठी नोंदणी सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.बाजार समितीचा पुढाकारकापूस उत्पादक पणन महासंघ आणि सिसिआयने कापूस खरेदी सुरू करावी, यासाठी नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. सभापती भाऊराव ढवळे, उपसभापती प्रवीण राठोड यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी रेटून धरली आहे. दारव्हा येथे नेर तालुक्याच्या कापूस खरेदी सुरू व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे.
नेरमधील कापूस उत्पादकांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST
कापसाचे उत्पादन घेणारा नेर तालुक्यात मोठा शेतकरी वर्ग आहे. बहूतांश शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. लगतच्या दारव्हा येथील खरेदी केंद्र सुरू झाले आहे. याठिकाणची कापूस खरेदी मर्यादा अतिशय कमी आहे. दोन तालुक्यांच्या कापूस खरेदीची क्षमता दारव्ह्यात नाही. यामुळे नेर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नेरमधील कापूस उत्पादकांची कोंडी
ठळक मुद्देखरेदी केंद्रच नाही : घरातील साठवणूक जोखमीची