पोलीस अधीक्षकांना निवेदन : राज्य पोलीस पाटील असोसिएशनहिवरी : यावली (कारेगाव) येथील पोलीस पाटील वीरेंद्र नामदेव राठोड यांच्या हत्त्येची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनतर्फे पोलीस अधीक्षकांना सोमवारी निवेदन देण्यात आले. वीरेंद्र राठोड यांची घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावातूनच त्यांची दारू माफियांनी कट रचून हत्या केली. मात्र या घटनेतील आरोपी अजूनही फरार आहे. त्यांना शोधून खुनाचा गुन्हा दाखल करावा, मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि दारूची वाहतूक करणाऱ्यांना अटक व्हावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असोसिएशनचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे, उपाध्यक्ष लोपचंद राठोड, राज्य सहसचिव अशोक वैरागडे आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी वीरेंद्र राठोड यांच्या कुटुंबाची भेट घेतली. (वार्ताहर)
पोलीस पाटलाच्या हत्त्येची चौकशी करा
By admin | Updated: July 7, 2015 01:59 IST