शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंनो, सुवर्ण पदकासाठी खेळा!

By admin | Updated: March 4, 2017 00:59 IST

खेळ देशाचा गौरव असतो. विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करीत असते. तेव्हा खेळाडूंनी खेळाचे कौशल्य प्राप्त

अशोक ध्यानचंद : विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेचे उद्घाटन यवतमाळ : खेळ देशाचा गौरव असतो. विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करीत असते. तेव्हा खेळाडूंनी खेळाचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करावे, दररोज आपल्या खेळाचे विश्लेषण करावे, खेळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची आकांशा ठेवावी व देशासाठी सुवर्ण पदक प्राप्त करण्याच्या ध्येयाने खेळावे, असे आवाहन हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांचे सुपुत्र माजी आॅलिम्पिक खेळाडू अशोक कुमार यांनी विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट व यवतमाळ वुमेन्स स्पोर्टस् क्लबच्यावतीने येथील नेहरू स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला आहे. शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आॅलिम्पिकपटू अशोक ध्यानचंद होते. अध्यक्षस्थानी विनायक दाते होते. यावेळी मंचावर विदर्भ हॉकी संघटनेचे सचिव डी. करुणाशंकर, सहसचिव प्रमोद जैन, शिवछत्रपती पुरस्कार विजेते टी.एन. सिंध्रा, श्याम शर्मा, प्रदीप शेटीये, अनिल नायडू, बबलू यादव आदींची उपस्थिती होती. अशोककुमार यांनी ध्यानचंद यांच्या परिवारातून व त्यांचा सुपुत्र असल्याचा अभिमान वाटत असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. राष्ट्रीय वर्ल्ड कप व आॅलिम्पिक स्पर्धेतील अनुभव विषद केले. तसेच हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्या प्रेरणात्मक आठवणींना उजाळा दिला. उल्लेखनीय म्हणजे यवतमाळचे खेळाडू बबलू यादव यांच्यासोबत १९७१ मध्ये कटक (ओरिसा) येथील राष्ट्रीय स्पर्धेत सोबत खेळल्याचा अभिमानाने उल्लेख केला. यावेळी अशोककुमार यांचा यवतमाळ नगरीच्यावतीने पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डी.करुणाशंकर यांनी केले. संचालन प्रा.अनंत पांडे यांनी तर आभार मनीषा आकरे यांनी मानले. (क्रीडा प्रतिनिधी)