शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खेळणाऱ्यांनो, सावधान; जुगार अड्ड्यांवरही होऊ शकतो कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 13:12 IST

लॉकडाऊन काळातही जुगार अड्डे बहरलेले आहेत. पण हे जुगार अड्डे धोकादायक ठरत आहेत. कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ही बाब उघड झाली आहे. अमरावतीत अशाच एका जुगार अड्ड्यावरून राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर या जुगार अड्डा चालकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.

ठळक मुद्देपिसणाऱ्या पत्त्यांना लागतात अनेक हात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन काळातही जुगार अड्डे बहरलेले आहेत. पण हे जुगार अड्डे धोकादायक ठरत आहेत. कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ही बाब उघड झाली आहे. अमरावतीत अशाच एका जुगार अड्ड्यावरून राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर या जुगार अड्डा चालकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित गुटखा कुठेही सर्रास मिळतो व चालतो. कारवाईची जबाबदारी असलेल्यांचाच त्याला आशीर्वाद असतो. जगभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. हजारो लोकांचा त्यात बळी गेला आहे. महाराष्ट्रातही बळींचा आकडा एक हजारांकडे पोहोचतो आहे. किमान लॉकडाऊन काळात जीवाच्या भीतीने हे अवैध धंदे बंद असावे अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात यातील अनेक अवैध धंदे सुरू आहेत. जुगार अड्डे-क्लबसुद्धा अनेक ठिकाणी बहरले आहेत. काहींनी शहराऐवजी ग्रामीण भागातील क्लबवर जाऊन खेळणे सुरू केले. परंतु हा जुगार जीवघेणा ठरू शकतो. अमरावती जिल्ह्यात अशाच एका जुगार क्लब चालकाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर त्याच्याकडे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या एका राजकीय नेत्याला कोरोनाचा संसर्ग झाला. तेथे खेळायला येणाऱ्या इतरांनाही हा संसर्ग असण्याची भीती वर्तविली जात आहे. कधी काळी शासनाच्या तिजोरीतील ईनकमची छोटी चाबी सांभाळणारा हा दमदार नेता हादरला आहे. शहरापासून दूरवर त्यांच्यावर उपचार सुरू आहे.वास्तवावर घातले पांघरुणपोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याच्या भीतीने जुगार क्लबमधून संसर्ग झाल्याची बाब शहरात कुठेही रेकॉर्डवर घेतली गेलेली नाही. ती सर्वच स्तरावरून दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु अमरावतीमधील या घटनेने जुगार खेळणाऱ्या तमाम शौकिनांना धोक्याचा इशारा दिला आहे. जुगारासाठी वाटल्या जाणाऱ्या पत्त्यांना खेळणाºया अनेकांचे हात लागतात व त्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो, ही बाब स्पष्ट झाली आहे.जिल्ह्यातही राजकीय उठबसयवतमाळ जिल्ह्यातही शहर व ग्रामीण भागात अनेक जुगार क्लब सुरू आहेत. यातील काही क्लबवर राजकीय नेते-कार्यकर्त्यांची तासन्तास बैठक असते. पिसलेल्या पत्यांना त्यांचाही हात लागतो. त्यामुळे कोणत्याही जुगार अड्डा-क्लबवर खेळणाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो.संयम पाळल्यास धोका टळू शकतोशौकिनांनी जुगार अड्ड्यावर जाणे, किमान लॉकडाऊन काळात संयम राखणे जीविताच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे. काहींनी क्लबवर खेळल्यास चर्चा होते म्हणून स्वत:च्या घरीच जुगाराचे दुकान मांडण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु तेथेही खेळणाऱ्या अनेकांची हात पत्त्यांना लागत असल्याने कोरोना संसगार्चा धोका कायम राहतो. कोरोनाच्या या महामारीत जुगार खेळणारेच नव्हे तर खर्रा, गुटखा खाणारे, गावठी-अवैध दारू पिणारे या सर्वांसाठीच जीव वाचवायचा असेल तर स्वयंशिस्त महत्वाची ठरणार आहे.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस