शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा तोच, बिल नवे

By admin | Updated: June 5, 2014 00:01 IST

पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनेला जिल्ह्यात वाळवी लागली आहे. दरवर्षी वक्षारोपणाचा खड्डा तोच दिसतो, बिल मात्र नव्याने काढण्यात येत आहे. ही योजना राबविण्यात कुणालाही

सुरेंद्र राऊत - यवतमाळ पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनेला जिल्ह्यात वाळवी लागली आहे. दरवर्षी वक्षारोपणाचा खड्डा तोच दिसतो, बिल मात्र नव्याने काढण्यात येत आहे. ही योजना राबविण्यात कुणालाही स्वारस्य दिसत नसून केवळ कागदोपत्री खानापूर्ती केली जात आहे. वृक्ष लागवडीवर विशेष भर देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. गावात लोकसंख्येइतके वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड, पर्यावरण समृध्दी आणि शतकोटी वृक्ष लागवड या सारख्या योजना कित्येक वर्षापासून कागदावरच राबविल्या जात आहे.  शासनाच्या सर्वच यंत्रणांनी पर्यावरणासाठी काम करणे  अपेक्षित धरून शतकोटी वृक्ष लागवड योजना तयार करण्यात आली. यात जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे, सामाजिक वनीकरण विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वच विभागाकडून केंद्राची ही योजना  दरवर्षी पावसाळ्य़ापूर्वी मोठा गाजावाजा करून राबविण्यात येते. वृक्ष लागवडीचे आकडे लाखोंच्या घरात दाखविले जाते. प्रत्यक्षात मात्र तोच खड्डा कायम ठेवून दरवर्षी तेथे लागवड केली जाते. या योजनांसाठी येणारा लाखोंचा निधी जुनाच खड्डा नव्याने दाखवून लाटला जातो. या प्रकारामुळे आजही रस्त्याच्या कडा, गावाकडे माळरान उजाड दिसत आहे. ज्या वन विभागावर वृक्ष कटाईपूर्वी दुप्पट वृक्ष लागवडीची जबाबदारी तेथेही हाच कित्ता गिरवल्या जात आहे. सरपणासाठी वृक्षांची कत्तल होऊ नये म्हणून पोड, तांडे, वाड्या, वस्त्या येथे गॅस सिलिंडरचे वाटप केले. मात्र याच यंत्रणेच्या मुकसंमतीने अमुल्या अशी वनसंपदा ट्रक मध्ये भरून लाखोंचा मलिदा लाटला जात आहे. वृक्षतोड झाली म्हणून संवर्धन करणार्‍या यंत्रणेतील एकाही अधिकार्‍याला जबाबदार धरण्यात आल्याचे ऐकीवात नाही.