शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट

By admin | Updated: August 20, 2016 00:04 IST

यवतमाळ आणि उसमानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखला जातो.

पांडुरंग फुंडकर : यवतमाळ, उस्मानाबादसाठी ११०० कोटी यवतमाळ : यवतमाळ आणि उसमानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखला जातो. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनातर्फे ११०० कोटींचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी येथे केली. येथील वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुले आणि मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीप्रकाश दाणी, कृषि शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त माई, कुलसचिव डॉ. कडू, नितीन हिवसे, गोपी ठाकरे, अधिष्ठाता डॉ. भाले उपस्थित होते. फुंडकर यांनी शेतीची स्थिती सुधारण्यासोबतच आत्महत्या प्रवण यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११०० कोटींचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतीशी निगडीत जोडधंदा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून कृषिला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी महाविद्यालयांतील संशोधन, उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्री फुंडकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) ‘ती’ महाविद्यालये बंद करणार विद्यार्थ्यांसाठी कृषि महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. मात्र या महाविद्यालयांकडे कोणतीही सुविधा नाही. केवळ व्यवस्थापन कोट्यातून देणगी घेऊन ही महाविद्यालये प्रवेश देण्याचे काम करतात. येत्या तीन महिन्यात सुविधा नसणाऱ्यांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.