शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपायांच्या सुमारे ३00 पदांसाठी भरती पक्रिया घेतली जात आहे. या भरतीप्रक्रियेची शारीरिक क्षमता चाचणी येथील पळसवाडी पोलीस मैदानावर सुरू आहे.

पोलीस भरती : कायमस्वरूपी रोजगारासाठी सत्वपरिक्षा, तप्त उन्हातही उत्साह कायमयवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपायांच्या सुमारे ३00 पदांसाठी भरती पक्रिया घेतली जात आहे. या भरतीप्रक्रियेची शारीरिक क्षमता चाचणी येथील पळसवाडी पोलीस मैदानावर सुरू आहे. चाचणीच्या दुसर्‍या दिवशी अडीच हजार उमेदवारांनी त्यामध्ये सहभाग घेतला. जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून तप्त उन्हातही शारीरिक क्षमतेचे कसब करण्यात उमेदवार उत्साही होते. शारीरिक क्षमता चाचणी तर परीक्षेचा भाग आहे. मात्र त्यासाठी तप्त ऊन अंगावर झेलत उमेदवार    कायमस्वरूपी रोजगारासाठी सत्वपरिक्षाच देत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार यांच्या नेतृत्वात ही भरतीप्रक्रिया घेतली जात आहे. प्रथमच यवतमाळ जिल्हा पोलीस दलात ३00 शिपायांची म्हणजेच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदभरती घेतली जात आहे. भरती प्रक्रियेच्या शारीरिक क्षमता चाचणीच्या पहिल्या दिवशी एक हजार ५00 उमेदवारांना बोलाविण्यात आले. मात्र ८५0 उमेदवारांनीच हजेरी लावली. दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी दोन हजार ५00 उमेदवारांना बोलाविण्यात आले. त्यापैकी किती उमेदवारांनी पक्रियेत सहभाग घेतला. याचा आकडा सायंकाळी उशिरापर्यंत कळू शकलेला नव्हता. १00 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी आणि पुलअपचे १00 गुणांसाठी उमेदवारांकडून कसब करून घेतले जात होते. तप्त उन्हाच्या तडाख्यात दोन दिवसांपासून घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. मात्र भर उन्हात नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी मैदानी कसब करण्यात उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. भरतीत एखाद्या उमेदवाराला झुकते माप दिले जावू नये अथवा गैरप्रकार होवू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे खुद्द भरती प्रक्रियेत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवून होते. शिवाय पोलीस कर्मचार्‍यांकडून प्रत्येक क्रीडा प्रकाराचे आणि सहभागी उमेदवारांचे व्हीडीओ चित्रीकरण केले जात होते. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने त्यातही मैदानावरील प्रत्येक बाब टिपली जात होती. (स्थानिक प्रतिनिधी)