शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रकार तरुणाचा घाटंजीत निर्घृण खून

By admin | Updated: February 26, 2017 01:09 IST

पूर्ववैमनस्यातून छायाचित्रकार युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता येथील प्रोफेसर कॉलनीत घडली.

घाटंजी : पूर्ववैमनस्यातून छायाचित्रकार युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता येथील प्रोफेसर कॉलनीत घडली. अक्षय तुषार भोरे (२२), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्षय हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपले जुन्या बसस्थानकानजिक असलेले फोटो स्टुडीओचे दुकान बंद करून दुचाकीने प्रोफेसर कॉलनीतील घराकडे निघाला होता. प्रोफेसर कॉलनीमध्ये दबा धरून बसलेल्या अक्षय ऊर्फ बक्सा संतोष मस्कर (२२), चेतन सुखदेव टेकाम (२७), आकाश संतोष मस्कर (२७) तिघेही रा.घाटंजी, यांनी अक्षय भोरे याच्यावर मागाहून येत हल्ला केला. डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्याला खाली पाडले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षय आणि सदर तिनही आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याचा वचपा काढण्यात आल्याचे सांगितले जाते. घटनेतील अक्षय मस्कर व आकाश मस्कर हे दोघे भाऊ आहेत. या तीनही आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश भावसार, उपनिरीक्षक नीलेश उरकुडे करीत आहे. पोलीस उपनिरीक्षक पुप्पुलवार, उपनिरीक्षक डोंगरे, सुनील केवट, गणेश घोसे, गणेश आगे, जुनेद, सुनील दुबे, रितेश श्रीवास, मोहन कन्नाके, सुरेश गेडाम आदींनी घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली. (लोकमत चमू)