यवतमाळ : प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातर्फे स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ २७ मार्च रोजी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.बाबूजींचे समाधीस्थळ ‘प्रेरणास्थळा’वर सायंकाळी ६ वाजता ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून सहभागी होण्यासाठी छायाचित्र हे ए-४ साईजमध्ये असावे. छायाचित्रकाराने स्वत: काढलेलाच फोटो प्रदर्शित करावा, छायाचित्र हे ओरीजनल असावे, एडीट केलेले नसावे. स्पर्धेच्या अधिक माहिती व नोंदणीसाठी प्रा.व्ही.आर. शेळके (९०४९०९३५८३), प्रा.पी.पी. लोकुलवार (७७०९८११६८८), प्रा. एम.के. पोपट (९०९६७४६८५५) येथे संपर्क साधावा. या स्पर्धेत शालेय, उच्च माध्यमिक विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्व इच्छुक स्पर्धक सहभागी होऊ शकतात. अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभाग प्रमुख डॉ.डी.एन. चौधरी यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)
प्रेरणास्थळ आयोजन समितीतर्फे छायाचित्र स्पर्धा
By admin | Updated: March 24, 2015 23:56 IST